AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर कोणत्या फ्रेंचायझीसोबत खेळणार? हरभजन सिंग म्हणाला..

आयपीएल 2025 स्पर्धा बऱ्याच अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. कारण या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. काही खेळाडूंना खरेदीदार तर काही खेळाडूंना संधी मिळणार आहे. असं असताना दिग्गद खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार याची उत्सुकता आहे. या सर्वात मोठं नाव हे रोहित शर्माचं आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर कोणत्या फ्रेंचायझीसोबत खेळणार? हरभजन सिंग म्हणाला..
| Updated on: Aug 30, 2024 | 8:21 PM
Share

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीत आयपीएल 2024 स्पर्धेत मोठी उलथापालथ झाली. रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याची हाती सोपवली गेली. तेव्हापासून रोहित शर्मा फ्रेंचायझी सोडणार असा वावड्या उठल्या आहेत. रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीसोबत आहेत. गेली 13 वर्षे त्याने फ्रेंचायझीसोबत घालवली आहेत. तसेच पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण असं असताना मागच्या पर्वात हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात घेतलं आणि जबाबदारी सोपवली. पण टी20 वर्ल्डकप विजयानंतर सर्वच चित्र बदललं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता मुंबई इंडियन्स संघ त्याला रिटेन करणार की रिलीज करणार हे लिलावापूर्वीच स्पष्ट होईल. पण माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने रोहित शर्माबाबत एक भाकीत केलं आहे. जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं तर कोणत्या संघाकडून खेळेल सांगितलं आहे.

लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेच्या लिलावा दरम्यान हरभजन सिंगने टाइम्स नाउशी बोलताना रोहित शर्माचं भविष्याबाबत सांगितलं आहे. हरभजन सिंगच्या मते, रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत येणार की मुंबई इंडियन्ससोबत राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळी आयपीएल लिलाव खूप चर्चेत राहणार आहे. या लिलावात खूप सारी मोठी नावं असतील आणि कोणत्या संघात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हरभजनच्या या वक्तव्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की, जर मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाही तर दिल्ली कॅपिटल्ससोबत जुळवून घेईल.

दुसरीकडे, हरभजन सिंगला रोहित शर्मासाठी 50 कोटी मोजले जातील का? तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं. ‘माहिती नाही पण हे पैसे माझ्यासाठी नाहीत. जर रोहित शर्माला मिळाले तर मी त्याला सांगेन की माझा हिस्सा वेगळा कर.’, असं हरभजनसिंग मजेशीरपणे म्हणाला. रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांच्यात चांगलं बाँडिंग आहे. दोघंही बराच काळ एकत्र खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हरभजन सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.