IND vs BAN Super 8 T20 Highlights: टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच, बांगलादेशवर 50 धावांनी मात
India vs Bangladesh Super 8 T20 world Cup 2024 Score And Highlights In Marathi: टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध 50 धावांनी विजय मिळवून सेमी फायनलचा मार्ग आणखी सोपा केला आहे. तर बांगलादेशचं पॅकअप झाल्यात जमा आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आज 22 जून रोजी सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. टीम इंडिया बांगालदेशला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये या धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उपकर्णधार हार्दिक पंड्याने आधी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर 1 विकेट घेतली. तर कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील दुसरा आणि एकूण सलग 5 वा विजय ठरला आहे. टीम इंडिया सुपर 8 मधील तिसरा आणि अखेरचा सामना हा 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs BAN Live Score: टीम इंडियाचा सुपर 8 मधील सलग दुसरा विजय
टीम इंडियाने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील सलग दुसरा विजय ठरला. तर बांगलादेशचा सलग दुसरा पराभव ठरला.
-
IND vs BAN Live Score: जाकेर अली माघारी
बांगलादेशने सहावी विकेट गमावली आहे. जाकेर अली 1 धाव करुन आऊट झाला.
-
-
IND vs BAN Live Score: बांगलादेशला पाचवा झटका
बांगलादेशने पाचवी विकेट गमावली आहे. कॅप्टन नजमुल हुसैन शांतो 32 बॉलमध्ये 40 धावा करुन आऊट झाला.
-
IND vs BAN Live Score: शाकिब अल हसन आऊट
बांगलादेशने चौथी आणि मोठी विकेट गमावली आहे. शाकिब अल हसन कॅच आऊट झाला आहे. कुलदीप यादवने आपल्या बॉलिंगवर कुलदीपला कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. शाकिबने 11 धावा केल्या.
-
IND vs BAN Live Score: तांझिद हसन आऊट
टीम इंडियाने बांगलादेशला दुसरा झटका दिला आहे. तांझिद हसन 31 बॉलमध्ये 29 धावा करुन आऊट झाला. कुलदीपने तांझिदला एलबीडबल्यू आऊट केलं.
-
-
IND vs BAN Live Score: लिटन दास आऊट
हार्दिक पंड्याने बांगलादेशला पहिला झटका दिला आहे. लिटन दास 10 बॉलमध्ये 13 धावा करुन आऊट झाला आहे.
-
IND vs BAN Live Score: बांगलादेशला 197 धावांचं आव्हान
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 197 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियाने उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. इतिहासात अद्याप सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करता आलेला नाही.
-
IND vs BAN Live Score: शिवम दुबे आऊट
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. शिवम दुबे 24 बॉलमध्ये 34 धावा करुन आऊट झाला.
-
IND vs BAN Live Score: टीम इंडियाला चौथा झटका, ऋषभ पंत आऊट
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. ऋषभ पंत 24 बॉलमध्ये 36 धावा करुन आऊट झाला आहे.
-
IND vs BAN Live Score: सूर्यकुमार यादव दुसऱ्याच बॉलवर आऊट
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादवने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. तर दुसऱ्याच बॉलवर कॅच आऊट होऊन माघारी परतला.
-
IND vs BAN Live Score: टीम इंडियाला दुसरा धक्का, विराट क्लिन बोल्ड
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली 27 बॉलमध्ये 38 धावा करुन क्लिन बोल्ड झाला आहे.
-
IND vs BAN Live Score: टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट
टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीनंतर मोठा झटका लागला आहे. कॅप्टन रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला आहे. रोहितने 11 बॉलमध्ये 23 धावा केल्या.
-
IND vs BAN Live Score: सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सुपर 8 सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
-
IND vs BAN Live Updates: बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान
-
IND vs BAN Live Updates: टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप याद आणि, जसप्रीत बुमराह
-
IND vs BAN Live Updates: बांगलादेशने टॉस जिंकला
बांगलादेशने सुपर 8 फेरीतील टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेश कॅप्टन नजमूल हुसैन शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे.
-
IND vs BAN Live Updates: हेड टु हेड रेकॉर्ड्स
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20आय क्रिकेटमध्ये 13 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
-
IND vs BAN Live Updates: बांगलादेश क्रिकेट टीम
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकिब अल हसन, तॉहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.
-
IND vs BAN Live Updates: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
-
IND vs BAN Live Updates: टीम इंडिया बांगलादेश आमनासामना
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर 8 मधील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा, येथे होणार आहे.
Published On - Jun 22,2024 6:20 PM
