AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News Live : महायुतीने विकासाचाच अजेंडा मांडला-देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Dec 14, 2025 | 2:15 PM
Share

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News Live : महायुतीने विकासाचाच अजेंडा मांडला-देवेंद्र फडणवीस
breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Dec 2025 02:25 PM (IST)

    ठाण्यात आम आदमी पार्टीचा ‘झाडू’ भ्रष्टाचाराच्या विरोधात चालणार

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजायला सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ठाण्यात झाडू चालणार आहे. ठाण्यातील सावरकर नगर या प्रभागात आम आदमी पार्टीच मध्यवर्ती ठाणे जिल्हा कार्यालय उद्घाटन करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचे हे कार्यालय असून या कार्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित पाटील आणि सचिव अभिजित मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल आहे. येणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणूक मध्ये स्वबळावर सर्वत्र ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटील यांनी सांगितला आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये होणारा भ्रष्टाचार पूर्णतः झाडूने साफ करणार असल्याचे देखील अभिजित मोरे यांनी सांगितल आहे.

  • 14 Dec 2025 02:11 PM (IST)

    मंगेश ससाने यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी धारूर पोलिसात गुन्हा दाखल

    बीडच्या माजलगाव येथुन पुण्याकडे जात असताना ओबीसी समाजाचे नेते ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटाच्या परिसरात रात्री अचानक दगडफेक करण्यात आली. यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून त्यांच्या तक्रारीवरून धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून धारूर पोलिसांकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान मंगेश ससाने यांनी दोन आमदारांनी आपल्यावर हल्ला घडून आणल्याचा दावा केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

  • 14 Dec 2025 01:50 PM (IST)

    विदर्भ-मराठवाड्यावर निधी वाटपात अन्याय होऊ देणार नाही- फडणवीस

    गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या काही वाढीव काम सुरू आहे. 1555 कोटी गोसीखुर्दच्या कामांसाठी दिले. वैनगंगा-नळगंगा प्रकल्प विदर्भाचं भाग्य बदलणार आहे. विदर्भ-मराठवाड्यावर निधी वाटपात अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.

  • 14 Dec 2025 01:40 PM (IST)

    शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घोषित केलाय- फडणवीस

    येत्या काळात एक लाख मेगावॅटचे पंप स्टोअरेज सुरू होणार आहेत. येत्या काळात वीजेचे दर दोन टक्क्यांनी कमी होणार आहे. महाराष्ट्रात 76 हजार मेगावॅटचे पंप स्टोअरेज. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घोषित केलाय. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, बँकांना नको, असं फडणवीस म्हणाले.

  • 14 Dec 2025 01:30 PM (IST)

    विदर्भ, मराठवाड्यासाठी ‘कृषी-संजीवनी’ योजना गेमचेंजर- फडणवीस

    विदर्भ, मराठवाड्यासाठी ‘कृषी-संजीवनी’ योजना गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भातील दुष्काळी भागाला हिरवं करणारा हा प्रकल्प आहे. सौरऊर्जा राज्याला उपयोगी ठरणार आहे. कोल्हापूर-सांगलीतील पुराचं पाणी दुसरीकडे वळवलं जाणार, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

  • 14 Dec 2025 01:20 PM (IST)

    मुंबई तोडली जाईल अशी शंका मनात कुणी आणू नये- फडणवीस

    मुंबई तोडली जाईल अशी शंका मनात कुणी आणू नये. चंद्र-सूर्य. असेपर्यंत मुंबई, महाराष्ट्रातच राहणार. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्राला पुढे न्यायचंय, असं फडणवीस म्हणाले.

  • 14 Dec 2025 01:10 PM (IST)

    अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    “महायुतीतील तिन्ही नेते शासनात एकत्रित निर्णय घेतात. आलेल्या आव्हानांचा सरकारनं समर्थपणे सामना केला. आताच्या निवडणुकीत प्रचारावेळी आमचा विकासाचा अजेंडा होता. निवडणुका लांबल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु महाराष्ट्रातील विकास आता थांबणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.

  • 14 Dec 2025 12:58 PM (IST)

    एमडी ड्रॅग्सचा साठा प्रकरणी अंबादास दानवेंची टीका

    सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्या जवळ एमडी ड्रॅग्सचा साठा सापडल्याची माहिती मिळाली.एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ हे गाव आहे.मुंबई पोलिसांनी ही करावी केली.मात्र सातारा पोलिसांना याची माहिती नव्हती.काही स्थानिक लोक सरकारी कामात अडथळा आणला मात्र पोलिसांनी या लोकांवर कारवाई केली नाही.पोलिसांनी थातूरमातूर कराई केली. बंगालचे लोकांना अटक केली आहे.मात्र बंगालच्या लोकांना कमला लावणारे कोण? आणणारे कोण?हा प्रश्न गृहमंत्र्यांना पडल नाही का? गृह खात कुणाला तरी लपवत आहे. मुंबईच्या पोलिसांना साताऱ्याला जावे लागते मग साताऱ्याचे पोलिस याला जबाबदार नाही का? फडणवीस प्रामाणिकपणे काम करत आहे. मग अशा पद्धदीनने काही लोकांना वाचवण्याचे काम कसे करता हा प्रश्न आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

  • 14 Dec 2025 12:50 PM (IST)

    तीन आरोपींना अटक

    डोंगराळे चिमुकली अत्याचार प्रकरणातील आक्रोश मोर्चादरम्यान न्यायालयात गोंधळ घालणाऱ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज या तिघांना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. 250 लोकांवर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मालेगाव वकील संघाने आरोपींची बाजू घेण्यास नकार दिला.

  • 14 Dec 2025 12:40 PM (IST)

    जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज

    जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचा पाहायला मिळत आहे. भाजपकडून इच्छुकांना जवळपास साडेपाचशे पेक्षा जास्त अर्जांचे वाटप करण्यात आले असून उद्या सोमवार 15 डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. युती झाली तर ठीक नाहीतर भाजपने महापालिकेच्या सर्व 75 जागांवर तयारी केल्याचं महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितलं. युती संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते घेतील, त्यानुसार युतीमध्ये ज्या पद्धतीने जागा येतील त्या पद्धतीने इतर पक्षांसाठी कार्यकर्ते काम करतील.

  • 14 Dec 2025 12:30 PM (IST)

    या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्या

    सिल्लोड तालुक्यातील भराडी ज्ञानविकास प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम राबवला. आपले काम काढून घेण्यासाठी झाडे तोडणे, कापणे किंवा जाहिरातिचे फलक लावण्यासाठी खिळे ठोकतात. विद्यार्थ्यांनी सिल्लोड-कन्नड रस्त्यावर झाडांची पाहणी करून जाहिरात फलक हटवत, खिळे काढून पर्यावरण पुरक संदेश दिला.

  • 14 Dec 2025 12:20 PM (IST)

    नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या

    नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आक्रमक झाले आहेत. २२ तारखेला भिवंडीतून पायी दिंडी मोर्चा काढत नवी मुंबई विमानतळावर धडकणार आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी आज डोंबिवलीत २७ गावांतून जनजागृती बाईक रॅलीस सुरुवात होणार आहे.

  • 14 Dec 2025 12:10 PM (IST)

    तपोवनमध्ये हरित लवाद याचिकाकर्त्याची पहाणी

    हरित लवाद याचिकाकर्ते ऍड. श्रीराम पिंगळे वृक्षांच्या पाहणीसाठी तपोवनमध्ये दाखल झाले.तपोवन येथील वृक्षांच्या संदर्भात हरित लवादाची याचिका दाखल केली होती. पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा करत तपोवन येथील वृक्षांची त्यांनी पाहणी केली. यावेळी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला श्रीराम पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. हरित लवादाने 15 जानेवारी पर्यंत वृक्षतोडी स्थगिती दिली होती.

  • 14 Dec 2025 12:00 PM (IST)

    101 गीर गायीचे वाटप

    धाराशिवमध्ये आज शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना 101 गीर गायीचे वाटप करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वाटप होणार आहे. जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यात पुरामुळे शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहुन गेली होती.

  • 14 Dec 2025 11:57 AM (IST)

    लियोनेल मेस्सीच्या GOAT इंडिया टूरमुळे मुंबईत वाहतूकित बदल

    आज होणाऱ्या मेस्सीच्या मुंबई कार्यक्रमाआधी दक्षिण मुंबईत दुपारी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत मोठी गर्दी व वाहतूक कोंडीचा इशारा देण्याता आला आहे.  मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल केले आहेत. वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात पार्किंग पूर्णतः बंद राहणार आहे. मरीन ड्राइव्ह, वीर नरिमन रोड, कोस्टल रोडसह अनेक मार्गांवर एकमार्गी वाहतुकीवर बहुतांश निर्बंध घालण्यात आलेत. नागरिकांना सार्वजनिक वाहतूक जसे लोकल ट्रेन व मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

  • 14 Dec 2025 11:45 AM (IST)

    हरित नाशिक उपक्रमाची सुरुवात साधू महंतांच्या हस्ते होणार

    नाशिक शहरात नवीन 15000 झाडे लावण्यात येणार असून त्याची सुरुवात अखिल भारतीय स्तरावर होणार. विविध आखाड्यांचे प्रतिनिधी स्थानिक साधू महंत त्याचबरोबर 28 राज्यांमधून प्रत्येक राज्याच्या साधू महंतांचे प्रतिनिधी उद्या नाशिकमध्ये येणार… भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी माहिती दिली आहे.

  • 14 Dec 2025 11:30 AM (IST)

    संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचे मृत्यू

    संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचे मृत्यू प्रकरणी अपडेट समोर आली आहे. अखेर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.  वन विभागाने ठार मारण्याचे आदेश काढल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चार वर्षीय सिद्धेश कडलग याच्यावर जवळे कडलग गावात अंत्यसंस्कार होणार आहेत. दुसरीकडे वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू झाला आहे.

  • 14 Dec 2025 11:16 AM (IST)

    जोधपूर एक्सप्रेसमधल्या प्रवाशांचा बदलापूर रेल्वे स्थानकात गोंधळ

    जोधपूर एक्सप्रेसमधल्या प्रवाशांचा बदलापूर रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला आहे. प्रवासादरम्यान सामान चोरीला गेल्यामुळे चेन खेचत प्रवाशांनी एक्सप्रेस थांबवली आहे. जोधपूर एक्सप्रेसमुळे सीएसएमटीहून बदलापूरकडे येणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आहे.

  • 14 Dec 2025 10:55 AM (IST)

    तलावात मृत माशांचा खच, नागरिकांना दुर्गंधीचा त्रास

    पंढरपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या यमाई तलावात उपनगरातील सांडपाणी मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली. सांडपाण्यामुळे तलावातील पाणी गढूळ झाले असून ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर मासे झाले मृत. तलावाच्या काठावर मृत माशांचा खच साचल्याने परिसरात तीव्र पसरली दुर्गंधी…….

  • 14 Dec 2025 10:50 AM (IST)

    1922 साली निर्माण करण्यात आलेला रोड ओव्हर ब्रिज आज पडणार

    सोलापूरच्या विकासाची ऐतिहासिक साक्ष देणारा दमाणी नगर येथील रेल्वे रुळावरील पूल आज होणार इतिहास जमा. 1922 साली निर्माण करण्यात आलेला रोड ओव्हर ब्रिज आज पाडण्यात येणार आहे. या पुलाची क्षमता संपल्यामुळे तो पाडण्यात येणार असून याच ठिकाणी 35 कोटी खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. दमाणी नगर येथील रेल्वे रुळावरील रोड ओव्हर पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाचाआज 12 तासाचा मेगाब्लॉक

  • 14 Dec 2025 10:45 AM (IST)

    अखेर नरभक्षक बिबटयाला ठार करण्याचे शासनाचे आदेश

    काल संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबटयाच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा झाला होता मृत्यू. काल रात्री पासुन वनविभागाकडून बिबटयाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू. सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा झाला मृत्यू… बिबटयाला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटूंबीयांची भूमिका

  • 14 Dec 2025 10:40 AM (IST)

    हरित नाशिक उपक्रमाची सुरुवात साधू महंतांच्या हस्ते होणार

    नाशिक शहरात नवीन 15000 झाडे लावण्यात येणार असून त्याची सुरुवात अखिल भारतीय स्तरावर होणार. विविध आखाड्यांचे प्रतिनिधी स्थानिक साधू महंत त्याचबरोबर 28 राज्यांमधून प्रत्येक राज्याच्या साधू महंतांचे प्रतिनिधी उद्या नाशिक मध्ये येणार

  • 14 Dec 2025 10:20 AM (IST)

    चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला ; हल्ल्यात चिमुरडा ठार

    संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात काल सायंकाळी घडली होती घटना. सिद्धेश सुरज कडलग या चार वर्षीय बालकाचा मृत्यू. नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाइकांसह ग्रामस्थांचा निर्णय. वनविभागाकडून बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर सुरू होती शोध मोहीम. परिसरात अनेक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचा ग्रामस्थांचा दावा…

  • 14 Dec 2025 10:10 AM (IST)

    कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ऊर्जा बचतीचा अनोखा उपक्रम

    केडीएमसीत ऊर्जा संवर्धन सप्ताह २०२५ निम्मित सायकल जनजागृती रॅली काढत दिले पर्यावरणाचे संदेश. 200 सायकलपटूंचा जनजागृती रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग; हरित व सौर ऊर्जेचा वापर जास्त करावे आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन

  • 14 Dec 2025 09:58 AM (IST)

    सोलापूर जनहित शेतकरी संघटनेच्या ऊस दरासाठीच्या आंदोलनाला यश; साखर आयुक्तांकडून मागण्या मान्य

    सोलापूरमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. उसाला त्वरित दर जाहीर करणे आणि थकीत ऊस बिलांवर त्वरित व्याज मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने पुणे येथील साखर आयुक्तालयासमोर आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्तांनी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, जनहित शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना इशारा दिला आहे. कारखानदारांनी आता तात्काळ उसाला साडेतीन हजार रुपये दर जाहीर करावा, अन्यथा सर्व साखर कारखाने बंद पाडण्यात येतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

  • 14 Dec 2025 09:49 AM (IST)

    जतमधील संखला स्वतंत्र तालुका जाहीर करा, ग्रामस्थांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथे स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मुख्य मागणीसाठी संखसह आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील संख आणि परिसरातील गावांना सोयीचे ठरावे म्हणून येथे अप्पर तहसील कार्यालय अस्तित्वात आहे.

  • 14 Dec 2025 09:39 AM (IST)

    बदलापूरमधील स्पर्श हॉस्पिटलजवळ भीषण आग, अल्फा फार्मसी जळून खाक, जीवितहानी टळली

    बदलापूर येथील घोरपडे चौकात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. स्पर्श हॉस्पिटलच्या तळमजल्यावर असलेल्या अल्फा लाईफस्टाईल फार्मसीला ही आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग इतकी मोठी होती की संपूर्ण फार्मसी जळून खाक झाली, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 14 Dec 2025 09:32 AM (IST)

    सांगलीच्या देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी चार बिबटे; बेल्जियम शेफर्डमुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले

    सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावात एकाच वेळी चार बिबटे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भागात बिबट्यांचा वाढता वावर असतानाच, एकाच ठिकाणी चार बिबटे दिसल्याने शेतकरी वर्गात मोठी घबराट पसरली आहे.

  • 14 Dec 2025 09:22 AM (IST)

    गोंदिया स्थानकावर रेल्वे पोलिसाचा धाडसीपणा, प्रवाशाचे वाचवले प्राण

    गोंदिया रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असलेल्या एका रेल्वे पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानामुळे एका यात्रेकरूचे प्राण वाचले. गीतांजली एक्स्प्रेस सुटल्यानंतर पाणी घेण्यासाठी खाली उतरलेल्या यात्रेकरूचे गाडीमध्ये चढताना तो खाली पडला. ही घटना पाहताच कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस दलातील जवान अमित कुमार यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि यात्रेकरूला पकडून त्याला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी कार्यामुळे अमित कुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 14 Dec 2025 09:16 AM (IST)

    कल्याण डोंबिवली पालिकेचा अजब कारभार, आदिवासी विधवा महिलेच्या झोपडीला २.३३ लाखांची नोटीस

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे. टिटवाळा येथील एका कातकरी आदिवासी विधवा महिलेच्या झोपडीला थेट २ लाख ३३ हजार मालमत्ता कराची नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी पालिकेने सदर महिलेला १ लाख ८२ हजार ६६४ रुपयांचे मालमत्ता कराचे बिल पाठवले होते आणि ते बिल न भरल्यामुळे पालिकेने आता ही मोठी नोटीस धाडली आहे. पालिकेच्या या कृतीनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून, पालिकेवर मोर्चा काढत याबद्दल जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  • 14 Dec 2025 09:07 AM (IST)

    नाशिकमध्ये भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू, १२२ जागांसाठी ९८८ अर्ज

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज रविवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेत १२२ जागांसाठी अर्ज केलेल्या तब्बल ९८८ इच्छुकांना सामोरे जावे लागणार आहे. आमदार राहुल ढिकले आणि संघटन मंत्र्यांसह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली ही मुलाखत प्रक्रिया होणार आहे. इच्छुकांनी मुलाखतीसाठी येताना कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता, केवळ आपले सामाजिक कार्य, शैक्षणिक पात्रता आणि अर्जासोबत भरलेली प्रश्नावली आणण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

  • 14 Dec 2025 09:03 AM (IST)

    गोंदियात ३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; नक्षली चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

    गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे. नुकतेच दरेकसा एरिया कमिटीच्या तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यामुळे जिल्ह्यातील नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यापूर्वीच ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात आता नक्षल चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, जे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक पाऊल आहे.

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत असताना, नागपूरमध्ये यंदा मुंबईकरांना खूश करणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये ‘पागडी सिस्टिममुक्त’, ‘ओसी गिफ्ट’, झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘अभय योजनेला मुदतवाढ’, आणि पुनर्विकासासाठी ‘हाऊसिंग फॉर ऑल’ यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांना आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी कामांमुळे जम्बो मेगाब्लॉकला सामोरे जावे लागत आहे; यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, या घडामोडीमुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Published On - Dec 14,2025 8:59 AM

Follow us
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.