AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पराभवाची पाच कारणं, जाणून घ्या कुठे काय चुकलं ते..

भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमावला. खरं तर चौथ्या दिवसापर्यंत हा सामना भारतीय संघ आरामात जिंकेल असं वाटत होतं. पण पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात धडाधड विकेट पडल्या आणि पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पराभवाची पाच कारणं, जाणून घ्या कुठे काय चुकलं ते..
IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पराभवाची पाच कारणं, जाणून घ्या कुठे काय चुकलं ते..Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 14, 2025 | 10:37 PM
Share

भारतीय संघाने लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची मोठी संधी गमावली. भारताला तिसरा कसोटी सामना जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि 22 धावांनी निसटता पराभव झाला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर पडला आहे. लॉर्ड्स कसोटीतील काही चुका टीम इंडियाला कारणीभूत ठरल्या. असं नेमकं काय झालं की भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चला जाणून घेऊयात पराभवाची कारणं…

शुबमन गिलचा दृष्टीकोन : टीम इंडियाच्या पराभवासाठी शुबमन गिलची वृत्ती कारणीभूत ठरली. मागच्या दोन सामन्यात शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने दोन्ही सामन्यात शतकी खेळी केली. पण तिसऱ्या कसोटीत त्याने धावा करण्याशिवाय सगळं केलं. इंग्लंडच्या फलंदाजांसोबत किंवा पंचाशी भांडताना दिसला. गिलने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात फक्त 6 धावा केल्या.

ऋषभ पंतची चूक : पराभवासाठी गिल इतका ऋषभ पंतही कारणीभूत ठरला आहे. पहिल्या डावात त्याने 74 धावांची खेळी केली होती. पण धावचीत झाला. केएल राहुलचं शतक व्हावं यासाठी त्याने धाव घेतली. त्याच्या या रणनितीने टीम इंडियाचं नुकसान झालं. अन्यथा पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली असती. भारताने पहिल्या डावात इंग्लंड इतक्याच 387 धावा केल्या.

टीम इंडियासाठी 63 धावा पडल्या महागात : टीम इंडिया आक्रमक खेळत होती. पण आक्रमकतेमुळे भारतीय संघाची घसरगुंडी झाली. केएल राहुल, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, शुभमन गिल, मोहम्मद सिराज हे सर्व इंग्लिश खेळाडूंशी भांडण्यात व्यस्त होते. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात 63 अतिरिक्त धावा दिल्या. याच धावा पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.

केएल राहुलची चूक : पहिल्या डावात केएल राहुलने इंग्लंडचा यष्टीरक्षक जेमी स्मिथचा झेल सोडला होता. झेल सोडला तेव्हा तो फक्त 5 धावांवर होता. मात्र त्यानंतर त्याने 51 धावा केल्या. म्हणजेच 46 धावांचा फटका बसला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांपर्यंत मजल मारता आली.

त्या 4 विकेट्स : भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारताचा डाव 387 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात शेवटच्या चार विकेट अवघ्या 11 धावांवर गमावल्या. शेपटाच्या फलंदाजांनी हवं तसं योगदान दिलं नाही. त्यामुळे संघाचं नुकसान झालं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...