AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं पारडं जड! स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अशी बाजू आली समोर

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार आहे. पहिलाच सामना लीड्सवर खेळवला जाणार आहे. सामना इंग्लंडमध्ये होत असला तरी मालिकेत भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. असं का ते जाणून घ्या.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं पारडं जड! स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अशी बाजू आली समोर
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं पारडं जड! स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अशी बाजू आली समोरImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 18, 2025 | 4:43 PM
Share

भारत इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पहिला कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने 2007 नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे या मालिकेत इंग्लंडचं पारडं जड मानं जात आहे. पण चित्र अगदी त्याच्या उलट आहे. कारण एक आकडा पाहिला तर या मालिकेत इंग्लंडची धाकधूक वाढली आहे. इंग्लंड संघ मायदेशी खेळत असला तर भारताचं पारडं जड आहे. तुम्हाला कदाचित हे खरं वाटणार नाही. पण आकडेवारी तसंच सांगत आहे. इंग्लंड संघाची धुरा जेव्हापासून बेन स्टोक्सच्या हाती सोपवली गेली. तेव्हापासून संघ आक्रमक खेळी करत आहे. पण हीच आक्रमकता इंग्लंड संघाच्या अंगलट आली आहे. मागच्या पाच वर्षात इंग्लंड संघाने घराच्या मैदानावर 11 कसोटी मालिका खेळल्या आहेत. यात फक्त एक कसोटी गमावली आहे. पण असं असूनही त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

कमकुवत संघाना इंग्लंड संघाने केल पराभूत!

इंग्लंडने आपल्या देशात मागच्या पाच ज्या काही कसोटी मालिका जिंकल्या त्यात कमकुवत संघांना पराभूर केलं आहे. 2020 मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकली. 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला पराभूत केलं. नुकतीच पार पडलेल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केलं. भारत आणइ इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. त्यानंतर 2023 मध्ये झालेली एशेज मालिकाही 2-2 ने ड्रॉ झाली. 2021 मध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला 1-0 ने पराभूत केलं होतं. मागच्या पाच वर्षात इंग्लंडने दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत केलं. त्यामुळे दिग्गज संघांसोबत जिंकणं इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरलं आहे.

इंग्लंड टीमची धाकधूक वाढली

मागच्या पाच वर्षातील आकडेवारी पाहून इंग्लंडची धाकधूक वाढली आहे. इंग्लंडने लीड्स कसोटीसाठी हिरव्या गवताळ विकेटऐवजी पाटा विकेटची मागणी केली आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला फलंदाजी करणं सोपं होईल. यावरून इंग्लंड संघाला भारताच्या वेगवान गोलंदाजीचं किती भीती आहे हे स्पष्ट दिसून येते. कारण भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णासारखे चांगले वेगवान गोलंदाज आहे. तसेच शार्दुल ठाकुर आणि अर्शदीप सिंहही संघात आहेत. त्यामुळे इंग्लंडने आतापासून आपली मागणी समोर ठेवली आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.