AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजूचा शतकी खेळीसह कारनामा, कॅप्टन सूर्याचा रेकॉर्ड मोडला, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात बचावला

Sanju Samson Record : संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात धावांसह विक्रमांचा पाऊस पाडला. संजूने शतक करत सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड ब्रेक केला. तर रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी साधली.

संजूचा शतकी खेळीसह कारनामा, कॅप्टन सूर्याचा रेकॉर्ड मोडला, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात बचावला
sanju samson century against south africaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 08, 2024 | 11:25 PM
Share

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने डरबन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात इतिहास घडवला आहे. संजू सॅमसन टी 20i क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सलग 2 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. संजूने अवघ्या 47 बॉलमध्ये 7 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. संजू यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेगवान शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला. संजूने याआधी 12 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं. तेव्हा संजूने 47 चेंडूत 111 धावांची खेळी केली होती.

संजूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम सुरुवात केली. संजूने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडून काढला. संजूने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 20 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. संजू 50 बॉलमध्ये 107 रन्स करुन आऊट झाला. संजूने या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार लगावले. संजूने यासह सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला तर रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली.

नक्की रेकॉर्ड काय?

संजू टीम इंडियासाठी टी 20i सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. संजूआधी माजी कर्णधार रोहित शर्मा याने आजपासून 7 वर्षांआधी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका डावात 10 सिक्स खेचले होते. तर संजूने आता 10 सिक्स लगावून सूर्याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे. सूर्याने श्रीलंकेविरुद्ध 2023 मध्ये 9 सिक्स खेचले होते.

संजू सॅमसनची झंझावाती खेळी

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.