AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Test: भारताच्या पराभवाची पाच कारणं, असं झालं म्हणून हरलो

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताचा 1-0 ने पराभव झाला. त्यामुळे मालिका वाचवण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आलं आहे. इतकंच काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही मोठा फटका बसला आहे.

IND vs SA Test: भारताच्या पराभवाची पाच कारणं, असं झालं म्हणून हरलो
IND vs SA Test: भारताच्या पराभवाची पाच कारणं, असं झालं म्हणून हरलोImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 16, 2025 | 3:50 PM
Share

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. खरं तर पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाची बाजू भक्कम होती. मात्र तिसऱ्या दिवशी सर्वच चित्र पालटलं आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करताना भारताने 189 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावात भारताकडे 30 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळतातना दक्षिण अफ्रिकेने 153 धावा केल्या आणि 30 धावा वजा करता 123 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला या धावा काही करता आल्या नाहीत. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 93 धावांवर तंबूत परतला. भारताला दुसऱ्या डावात 30 धावा तोकड्या पडल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवाची पाच कारणं समजून घेऊयात..

पराभवाची पाच कारणं

  1. भारतीय फलंदाज स्पोर्टिंग विकेटवर चांगली कामगिरी करतात, त्यामुळे टर्निंग पिचची गरज नाही? असा एक रणनितीचा भाग आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली अशा रणनीती वापरून भारताला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप मिळाला होता. आताही तशीच भीती आहे.
  2. कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडूंवर जास्त विश्वास टाकला जात आहे. त्यामुळेही टीम इंडियाला फटका बसला असं म्हणावं लागेल. कोलकाता कसोटीत साई सुदर्शनला वगळून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेली. तसेच सहा गोलंदांजांसह कसोटी खेळणं जास्त आश्चर्यकारक होतं.
  3. कर्णधार शुबमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे भारताला फटका बसला. कारण दोन्ही डावात एक फलंदाज कमी होतो. कदाचित त्याने फलंदाजी केली असती तर चित्र वेगळं असू शकलं असतं.
  4. दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमाने चिवट खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावून टीम इंडियाला अडचणीत आणलं. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही हे विशेष..
  5. दक्षिण अफ्रिकेने 91 धावात 7 विकेट गमावल्या होत्या. पण पुढच्या तीन विकेटने भारतीय गोलंदाजांना खूपच त्रास दिला. या तीन विकेटने 62 धावा केल्या. त्याच धावा भारताला महागात पडल्या. इतकंच काय तर भारताच्या शेवटच्या तीन विकेट फक्त 16 धावात पडल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...