AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Test : नाणेफेकीचा कौल अफ्रिकेच्या बाजूने, प्लेइंग 11 बाबत कर्णधार ऋषभ पंत म्हणाला..

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना होत आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. कारण हा सामना ड्रॉ जरी झाला तरी भारताचा मालिका पराभव होईल. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत नुकसान होईल.

IND vs SA 2nd Test : नाणेफेकीचा कौल अफ्रिकेच्या बाजूने, प्लेइंग 11 बाबत कर्णधार ऋषभ पंत म्हणाला..
IND vs SA 2nd Test : नाणेफेकीचा कौल अफ्रिकेच्या बाजूने, प्लेइंग 11 बाबत कर्णधार ऋषभ पंत म्हणाला..Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Nov 22, 2025 | 8:45 AM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका विरुद्धचा दुसरा कसोटी खूपच महत्त्वाचा आहे. भारतीय संघावर मालिका गमवण्याचं संकट उभं आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी काहीही करून जिंकावं लागणार आहे. पण भारताच्या या सामन्यापूर्वीच टेन्शन आहे. कारण शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या सामन्याला मुकला आहे. तसेच कर्णधारपद ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. विकेट खूपच चांगली दिसतेय. आधी फलंदाजी करा, आधी मोठा स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. खेळपट्टीवर खरोखरच कोणतेही क्रॅक नाहीत. खूप उत्साहित आहे, या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्यास आनंदी आहे. एक बदल असून मुथुस्वामी येतोय.’

ऋषभ पंतकडे शुबमन गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपद देण्यात आले आहे. ऋषभ पंत म्हणाला की, ‘ हा एक अभिमानाचा क्षण आहे, ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे. तुम्हाला दोन्ही हातांनी ती संधी मिळवायची आहे. दोन बदल आहेत. नितीश रेड्डी आणि साई सुदर्शन संघात आले आहेत.’ खेळपट्टीच्या हिशेबाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. या सामन्यातील निकालावर प्रशिक्षक गौतम गंभीर याचीही कसोटी असणार आहे. त्यामुळे हा सर्वार्थाने महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकन संघ भारताला क्लीन स्वीप देण्याच्या उद्देश्याने मैदानात उतरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (डब्ल्यू), मार्को यानसेन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.