IND vs SA 1st Odi : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी देणार?
India vs South Africa 1st Odi Live Streaming : केएल राहुल याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिजनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताला कसोटी मालिकेत 0-2 ने पराभूत व्हावं लागलं. भारताला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. मात्र या मालिकेआधी भारताला 2 झटके लागले आहेत. भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनाही दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. त्यामुळे केएल राहुल याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना रविवारी 30 नोव्हेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तर tv9marathi.com या वेबसाईटवर क्रिकेट सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.
दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक सामन्यांत विजय
आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकूण 94 वेळा आमनेसामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 51 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच भारताला 40 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे.
रोहित-विराट एक्शन मोडमध्ये
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या अनुभवी जोडीच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. रोहित-विराट अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळले होते. त्यानंतर आता दोघेही महिन्यानंतर खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
