AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : केएल, जुरेल-जडेजाचा शतकी धमाका, दुसरा दिवसही भारताचा, विंडीज विरुद्ध 286 धावांची आघाडी

India vs West Indies 1st Test Day 2 Highlights and Updates : केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या भारताच्या त्रिकुटाने शतक ठोकत अहमदाबाद कसोटीतील दुसरा दिवस गाजवला. या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजच्या 162 च्या प्रत्युत्तरात 5 बाद 448 पर्यंत मजल मारली आहे.

IND vs WI : केएल, जुरेल-जडेजाचा शतकी धमाका, दुसरा दिवसही भारताचा, विंडीज विरुद्ध 286 धावांची आघाडी
KL Rahul Dhruv Jurel And Ravindra JadejaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 03, 2025 | 7:52 PM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी एकूण तिघांनी शतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 400 पार मजल मारता आली. भारताने दुसऱ्या दिवशी एकूण 327 धावा जोडल्या. भारताने अशाप्रकारे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजच्या 162 च्या प्रत्युत्तरात 128 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 448 धावा केल्या आहेत. भारताने अशाप्रकारे एकूण 286 धावांची आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाने विंडीजला 162 वर गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 38 ओव्हरमध्ये 121 रन्स केल्या होत्या. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशीप केली. भारताने कॅप्टन शुबमन गिलच्या रुपात तिसरी विकेट गमावली. शुबमनने 100 बॉलमध्ये 5 फोरसह 50 रन्स केल्या. त्यामुळे भारताचा स्कोअर 3 आऊट 188 असा झाला.

त्यानंतर केएल आणि ध्रुव या दोघांनी भारताचा डाव चालवला. या दरम्यान केएलने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 11 वं आणि मायदेशातील दुसरं शतक ठोकलं. मात्र शतकानंतर केएल आऊट झाला. केएलने 197 बॉलमध्ये 12 फोरसह 100 रन्स केल्या. केएल आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 4 आऊट 218 असा झाला. विंडीजने अशाप्रकारे ने 30 धावांच्या अंतराने भारताला आणखी एक झटका दिला. भारताने अशाप्रकारे ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावले.

पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी

केएल आऊट झाल्यानंतर उपकर्णधार आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजा-जुरेल जोडीने विंडीजला चांगलंच रडवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. ध्रुवने या दरम्यान कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. ध्रुवला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र ध्रुव 125 रन्सवर आऊट झाला. अशाप्रकारे विंडीजने ध्रुव-जडेजा जोडी फोडली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 206 रन्स जोडल्या.

भारताचा दुसऱ्या दिवशीही दबदबा

ध्रुवनंतर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर जडेजाची साथ देण्यासाठी मैदानात आला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी विकेटसाठी दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 24 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा याने या दरम्यान सहावं कसोटी शतक पूर्ण केलं.  भारताने अशाप्रकारे 128 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 448 रन्स केल्या आणि 286 धावांची भक्कम आघाडी घेतलीय. जडेजाने 5 सिक्स आणि 6 फोरसह नाबाद 104 रन्स केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर 9 रन्सवर नॉट आऊट आहे. विंडीजसाठी कॅप्टन रोस्टन चेज याने दोघांना बाद केलं. तर जोमेल वॉरिकन, खारी पियरे आणि जेडन सिल्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.