AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : रोहित शर्मा याला विराट कोहली बाबत विचारला असा प्रश्न, उत्तर देत केली बोलती बंद

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला काही तासात सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. विराट बाबत प्रश्न विचारताच सडेतोड उत्तर दिलं.

IND vs WI : रोहित शर्मा याला विराट कोहली बाबत विचारला असा प्रश्न, उत्तर देत केली बोलती बंद
IND vs WI : विराट कोहली याच्याबाबत प्रश्न विचारताच रोहित शर्मा याने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...
| Updated on: Jul 27, 2023 | 4:41 PM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका म्हणजे वर्ल्डकपपूर्वीची परीक्षा असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. या मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. कारण यातून आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी खेळाडू निवडले जाणार आहेत.भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्याने सडेतोडपणे आपली भूमिका मांडली आहे. संघातील असे काही खेळाडू आहेत, त्यांना आम्ही काहीच शिकवू शकत नाही. त्यांचा अनुभव दांडगा आहे.

विराट कोहलीबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा याला पत्रकाराने विराट कोहलीच्या शतकाबाबत प्रश्न विचारला. विराट जेव्हा शतक करत नाही तेव्हा तुझं त्याच्याशी काही बोलणं होतं का? या गुगली टाकलेल्या प्रश्नावर रोहित शर्माने सरळ षटकार ठोकला आणि आपल्या अंदाजात उत्तर दिलं.

“काही खेळाडू अनेक वर्षांपासून खेळत आहे. खोऱ्याने धावा केल्या आहेत. अशात त्यांना काही सांगण्याची गरज नाही. आम्ही फक्त नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. त्यांना स्वतंत्रपणे खेळण्याची प्रेरणा देण्याबाबत विचार करत असतो. संघात काही खेळाडू असे आहेत की त्यांना शिकवण्याची गरज नाही. बॅट अशी पकडा किंवा इनिंग्स अशी बिल्ड करा. आमचा हेतू फक्त संघातील वातावरण चांगलं ठेवणं आहे. खेळाडूंना चागलं वातावरण मिळणं महत्त्वाचं आहे.”, असं उत्तर रोहित शर्मा याने दिलं.

वेस्ट इंडिज मालिका महत्त्वाची

“वेस्ट इंडिज मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्डकपपर्यंत आम्हाला 12 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आम्हाला आता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक खेळाडूला संधी देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. या मालिकेत चांगली कामगिरी केली तर वर्ल्डकपमध्ये संघात निवड होण्याची शक्यता आहे.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.

दोन्ही संघांची संपूर्ण स्क्वॉड

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन, संजू सॅमसन, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार, शार्दुल ठाकुर, उम्रान मलिक, युझवेंद्र चहल

वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, किसी कार्टी, रोव्हमॅन पॉवेल, शिम्रॉन हेटमायर, अलिक अथान्झे, कायल मेयर्स, रोमारियो शेपर्ड, शाय होप (कर्णधार), अल्झारी जोसेफ, डोमिनिक ड्रेक्स, गुडाकेश मोटी, जायदेन सील्स्, केविन सिनक्लेयर, ओशेन थॉमस, यान्निक करियाह

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.