IND vs NZ, 2nd T20I Highlights: टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये विजयी सुरुवात

| Updated on: Nov 20, 2022 | 4:19 PM

भारत vs न्युझीलंड 2nd T20I लाइव्ह स्कोर अपडेट्स: आज दुसरा टी 20 सामना आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

IND vs NZ, 2nd T20I Highlights: टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये विजयी सुरुवात

India vs New Zealand, LIVE Score, T20 Updates: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज माऊंट माऊंगानुई येथे दुसरा टी 20 सामना झाला. टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आज मैदानात उतरली होती. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या बळावर 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 191 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला.

भारत: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

न्यूजीलंड: केन विलियमसन (कॅप्टन), डेवॉन कॉनवे, फिन एलेन, ग्लेन फिलिप्स, डेवन सिनवे, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, मायकल ब्रेसवेल, ईश सोढ़ी, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, टिम साऊदी, ब्लेयर टिकनर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Nov 2022 04:03 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये विजयी सुरुवात

    टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना जिंकून विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला.

  • 20 Nov 2022 03:55 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: कॅप्टन केन विलयम्सन बोल्ड

    18 ओव्हरअखेरीस न्यूझीलंडच्या 7 बाद 125 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलयम्सनने अर्धशतक झळकावलं. मोहम्मद सिराजने त्याला 61 धावांवर बोल्ड केलं.

  • 20 Nov 2022 03:45 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडचा डाव अडचणीत

    न्यूझीलंडच्या सहा विकेट गेल्या आहेत. मोहम्मद सिराजने सँटरनला आपल्याच गोलंदाजीवर 2 रन्सवर आऊट केलं. 16 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 6 बाद 99 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 03:23 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: विलयम्सन-मिचेलची जोडी मैदानात

    12 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 85 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 03:19 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 11 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    11 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 77 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केन विलयम्सन 30 आणि डॅरेल मिचेलची 5 जोडी मैदानात आहे.

  • 20 Nov 2022 03:12 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडची तिसरी विकेट

    युजवेंद्र चहलने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. त्याने ग्लेन फिलिप्सला बोल्ड केलं. 6 चेंडूत 12 धावा करताना त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. 10 षटकाअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 71 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 03:07 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का

    वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. डेवॉन कॉनवेला त्याने अर्शदीपकरवी झेलबाद केलं. कॉनवेने 22 चेंडूत 25 धावा करताना तीन चौकार लगावले. 9 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या 2 बाद 63 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 02:58 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 7 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    7 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या एक बाद 49 धावा झाल्या आहेत. कॉनवे 20 आणि विलयम्सन 24 धावांवर खेळतोय.

  • 20 Nov 2022 02:41 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडची इनिंग सुरु, एक विकेट

    पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला धक्का दिला आहे. फिन एलनला शुन्यावर अर्शदीपकरवी झेलबाद केलं. चार ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या एक बाद 16 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे आणि केन विलयम्सनची जोडी मैदानात आहे.

  • 20 Nov 2022 02:13 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: टिम साऊदीची हॅट्रिक, 3 चेंडूत 3 विकेट

    न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्रिक घेतली. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्या 13, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. सूर्यकुमार यादवला बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचली नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांच लक्ष्य दिलं आहे.

  • 20 Nov 2022 02:11 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: सूर्यकुमार यादवच शतक, न्यूझीलंडला दिलं मोठ लक्ष्य

    20 ओव्हर्समध्ये भारताने 6 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या शतकामुळे हे शक्य झालं. त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 7 षटकार आहेत.

  • 20 Nov 2022 02:01 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: सूर्यकुमार यादवच शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं

    सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात शतक झळकावलं. त्याने 49 चेंडूत शतक झळकावलं. हे टी 20 मधलं त्याच दुसरं शतक आहे. याआधी इंग्लंड विरुद्ध त्याने शतक झळकावलं होतं. 19 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 186 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 01:57 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 164 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 45 चेंडूत 89 धावांवर खेळतोय.

  • 20 Nov 2022 01:53 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 17 व्या ओव्हरमध्ये 6,4,4, टिम साऊदीला धुतलं

    17 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या 3 बाद 146 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार 72 आणि हार्दिक 8 धावांवर खेळतोय.

  • 20 Nov 2022 01:45 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: सूर्युकमार यादवची हाफसेंच्युरी

    सूर्यकुमार यादवच्या खेळात सातत्य कायम आहे. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकावली. 32 चेंडूत अर्धशतक झळकवताना त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. 16 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 129 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 01:42 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 119 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 01:35 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: श्रेयस अय्यर हिट विकेट

    चांगली फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाला. त्याने 9 चेंडूत 13 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. 13 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 3 बाद 110 धावा झाल्या आहेत. आता सूर्यकुमारला साथ देण्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आलाय.

  • 20 Nov 2022 01:29 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: ईश सोढीला धुतलं

    ईश सोढीने 12 वी ओव्हर टाकली. भारताच्या दोन बाद 97 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरने सोढीच्या ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या.

  • 20 Nov 2022 01:19 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: भारताला दुसरा झटका

    दमदार फलंदाजी करणारा इशान किशन OUT झाला. सोढीच्या गोलंदाजीवर त्याने साऊदीकडे झेल दिला. इशानने 31 चेंडूत 36 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. 10 ओव्हर्समध्ये भारताच्या 2 बाद 75 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरची जोडी मैदानात आहे.

  • 20 Nov 2022 01:15 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: सूर्यकुमार यादवचा षटकार

    9 ओव्हर्समध्ये भारताच्या एक बाद 69 धावा झाल्या आहेत. मिचेल सँटनरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार मारला.

  • 20 Nov 2022 01:12 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: पाऊस थांबला, सामना सुरु

    8 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. भारताच्या 1 बाद 59 धावा झाल्या आहेत. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात आहे.

  • 20 Nov 2022 12:49 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: पावसाचा व्यत्यय

    पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला आहे. 6.4 षटकात एक बाद 50 धावा झाल्या आहेत. इशान किशन 22 चेंडूत 28 आणि सूर्यकुमार यादव 5 चेंडूत 6 धावांवर खेळतोय. इशानने 4 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. सूर्यकुमारने 1 चौकार मारलाय.

  • 20 Nov 2022 12:34 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: ऋषभ पंत स्वस्तात OUT

    सहा ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. पावरप्लेमध्ये भारताच्या एक बाद 42 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आज स्वस्तात बाद झाला. 13 चेंडूत त्याने 6 धावा केल्या. यात एक चौकार होता. फर्ग्युसनने त्याला साऊदीकरवी झेलबाद केलं. इशान किशन 18 चेंडूत 20 आणि सूर्यकुमार 5 चेंडूत 6 धावांवर खेळतोय. इशानने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

  • 20 Nov 2022 12:28 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 5 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा टी 20 सामना सुरु आहे. 5 ओव्हर्सचा खेळ झालाय. भारताच्या बिनबाद 36 धावा झाल्या आहेत.

  • 20 Nov 2022 12:19 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: भारताची सावध सुरुवात

    भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या तिसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. टीम साऊदीने तिसरी ओव्हर टाकली.

  • 20 Nov 2022 12:15 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: 2 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. 2 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या दुसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 14 धावा झाल्या आहेत. एडम मिल्नेने दुसरी ओव्हर टाकली.

  • 20 Nov 2022 12:09 PM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: भारत वि न्यूझीलंड सामना सुरु

    भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंतने एक चौकार लगावला. टीम साऊदीने पहिली ओव्हर टाकली.

  • 20 Nov 2022 12:03 PM (IST)

    पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन

    राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक

    राज्यपालांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन

    पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसच आंदोलन

  • 20 Nov 2022 12:02 PM (IST)

    नाशिकमध्ये शिवप्रेमींचं धोतर जाळून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

    प्रतिकात्मक धोतर जाळून कोश्यारी यांच्या फोटोला मारले जोडे

    नाशिकच्या सातपूर परिसरात केलं शिवप्रेमींनी आंदोलन

    कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन

  • 20 Nov 2022 11:44 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

    भारत: इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल,

  • 20 Nov 2022 11:35 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडने जिंकला टॉस

    आज माऊंट माऊंगानुई येथे दुसरा टी 20 सामना होणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 20 Nov 2022 11:34 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: माऊंट माऊंगानुईमध्ये थांबला पाऊस

    माऊंट माऊंगानुईमध्ये पाऊस सुरु होता. पण आता हवामान स्वच्छ आहे. पीचवरुन कव्हर्स हटवण्यात आले आहेत. म्हणजेच मॅच वेळेवर सुरु होईल.

Published On - Nov 20,2022 11:31 AM

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.