AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan Preview : ‘तो’ बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, 10 महिन्यांपूर्वी नेमकं काय झालं? जाणून घ्या…

आशिया चषकातील आपल्या मोहिमेला भारत आणि पाकिस्तान जिंकण्याच्या इच्छेनंच सुरुवात करणार. उर्वरित सामन्यांपेक्षा हा सामना जिंकण्याचे दडपण या दोन संघांवर अधिक असणार आहे. याविषयी अधिक सविस्तर वाचा....

India vs Pakistan Preview : 'तो' बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, 10 महिन्यांपूर्वी नेमकं काय झालं? जाणून घ्या...
India vs PakistanImage Credit source: social
| Updated on: Aug 27, 2022 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना पहायला मिळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं खास लक्ष असणार आहे. यासामन्यासाठी आता काहीच तास उरले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील खास सामन्याची क्रिकेट (Cricket) जगता वाट पाहिली जात आहे. हा सामना उद्या म्हणजेच रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासह दोन्ही संघ आशिया चषक-2022 मधील आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. प्रत्येक संघाला आपला वाटा जिंकायचा असतो. भारत आणि पाकिस्तानचे संघही याच इच्छेनं मैदानात उतरतील पण उर्वरित सामन्यांपेक्षा हा सामना जिंकण्याचे दडपण या दोन संघांवर अधिक असणार आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आधीपासूनच अंदाज लावायला सुरुवात केली आहे.

10 महिन्यांपूर्वी पराभवाचा फटका

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे गेल्या दशकापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. परंतु 10 महिन्यांपूर्वी याच मैदानावर झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान त्यांना पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचे हे दोन्ही अनुभवी फलंदाज आता कथा बदलण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील.

फॉर्म दाखवण्याची हीच ती संधी…

रोहितला त्याच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनाला एक नवीन परिमाण द्यायचा आहे. तर कोहलीला कठीण काळातून सावरल्यानंतर फॉर्ममध्ये येण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ असेल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ अंतिम करणे हे भारतीय संघाचे मोठे लक्ष्य असेल. गेल्या 10 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत आणि अशा परिस्थितीत ते केवळ कोणत्याही मोठ्या स्पर्धेत आमनेसामने येतात. अशाप्रकारे, एकमेकांच्या खेळाडूंचे खेळाडू या खेळाशी अपरिचित राहतात.

आफ्रिदी समोर नसेल

मागच्या वेळी भारताचा पाकिस्तानशी सामना झाला तेव्हा शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळात किती सुधारणा झाली हे त्यांना कळले नाही आणि परिणामी भारतीय संघ 10 विकेट्सने पराभूत झाला. आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांमध्येच भारतीय शिबिरात खळबळ उडवून दिली. पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे रविवारी पाकिस्तानी गोलंदाजीचे नेतृत्व करण्यासाठी आफ्रिदी उपस्थित राहणार नाही.

संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दाहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.