भारतीय क्रिकेट संघात फूट! रहाणेसह पुजाराची कोहली विरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय संघात मागील काही दिवसांपासून बऱ्याच गोष्टी घडत आहे. काही दिवसांपूर्वीच कर्णधार विराट कोहलीने टी20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आता तो एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा देईल अशीही चर्चा आहे.

भारतीय क्रिकेट संघात फूट! रहाणेसह पुजाराची कोहली विरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
विराट आणि पुजारा
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:08 PM

मुंबई: विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. खेळावर ताण येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. पण कुठेतरी संघातील वादांमुळे अशाप्रकारचा निर्णय विराटने घेतली असल्याची चर्चा होतीच. आता या चर्चेसबंधित एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीम इंडियामध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हाव लागलं होतं. त्यानंतर संघातील सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी एका गोष्टीवरुन कर्णधार विराट कोहलीविरोधात (Virat Kohli) बीसीसीआयकडे (BCCI) तक्रार केली होती. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

समोर आलेल्या माहितीनुसार पुजारा आणि रहाणे या सीनियर खेळाडूंनी विराट कोहलीविरोधात BCCI चे सेक्रेटरी जय शाह यांच्याकडे स्वत: फोन करुन तक्रार केली होती. या रिपोर्टमध्ये पराभवानंतर विराटने रहाणे आणि पुजार या दोघांची सर्व संघासमोर खिल्ली उडवल्याची तक्रार दोघांनी केली होती.

नेमकं काय आहे रिपोर्टमध्ये?

रिपोर्टनुसार, ”भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंडला गेला असताना सर्व काही ठिक होतं. पण WTC Final मध्ये  न्यूझीलंड विरुद्ध पराभव मिळताच सारं काही बदललं. या सामन्यात भारतीय फलंदाजानी मोठी निराशा केली. त्यामुळे साहजिकच याचं सर्वाधिक खापर वरिष्ट फलंदाज रहाणे आणि पुजारावरच फुटणार होतं,  तसंच काहीसं झालं. सूत्रांच्या माहितीनुसार या मोठ्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने पुजारा आणि रहाणे यांची खिल्ली उडवली. पुजाराच्या स्लो स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित केले. तर रहाणेच्या खराब फॉर्मला विराटने टार्गेट केलं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनीही BCCI सेक्रेटरी जय यांना स्वत: फोन करत याबाबत तक्रार केली.

हे ही वाचा

RR vs RCB, Head to Head: आयपीएलमध्ये आज ‘रॉयल’ लढत, विराटसेना भिडणार राजस्थान रॉयल्सशी, प्लेऑफच्या एन्ट्रीसाठी सामना महत्त्वाचा

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

(Indian Cricket teams Senior batsmen pujara and rahane complaints  about virat kohlis captaincy says reports)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.