AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेला नमविल्यानंतर द्रविड गुरुजींसोबत खेळाडू डिनरला, कर्णधार धवनकडून खास फोटो शेअर

श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघातील काही खेळाडूंसमवेत डिनरला पोहोचला.

श्रीलंकेला नमविल्यानंतर द्रविड गुरुजींसोबत खेळाडू डिनरला, कर्णधार धवनकडून खास फोटो शेअर
राहुल द्रविड, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 9:16 AM
Share

मुंबई : भारतीय संघाने मंगळवारी श्रीलंकेला (India vs Sri Lanka) जबरदस्त पराभवाचा धक्का दिला. भारताचा पराभव नक्की असताना अष्टपैलू खेळाडू दीपक चहरने (Deepak Chahar) श्रीलंकेच्या मुखातला विजयाचा घास हिरावून घेतला. या सामन्यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेऊन मालिकाही खिशात घातली. श्रीलंकेला नमविल्यानंतर भारतीय संघ भलताच खूश आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) देखील आनंद झालाय. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघातील काही खेळाडूंसमवेत डिनरला पोहोचला.

विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी द्रविड गुरुजींबरोबर खेळाडू डिनरला

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार शिखर धवन, भुवनेश्वर कुमार तसंच त्याची पत्नी नुपूर दिसत आहेत. हा फोटो कुठल्याशा हॉटेलमधील असून डिनरसाठी हे सर्वजण गेल्याचं दिसून येत आहे.

भारताने श्रीलंकेला आस्मान दाखवलं

अतिशय रोमांचक सामन्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला 3 विकेट्सने हरवलं. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या स्पप्नांना सुरुंग लावला. पहिल्या फळीतील महत्त्वाचे सगळे शिलेदार तंबूत परतलेले असताना दीपक चहरने भुवीला साथीला घेऊन टीम इंडियाच्या विजयाची नौका पार करुन दाखवली.

व्हॉईटवॉशपासून वाचण्याचं श्रीलंकेपुढे आव्हान

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने लंकेला 2-0 असं नमवलं आहे. आता उर्वरित शेवटचा सामना शुक्रवारी (23 जुलै) रोजी होत आहे. या सामन्यात भारतापासून लंकेला व्हॉईटवॉशचा धोका आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. तसंच मालिका विजयानंतर भारतीय संघातल्या खेळाडूंचा आत्मविश्वास सातव्या मंजिलवर आहे.

indian team player Dinner With Coach Rahul Dravid After India Won One Day Series Against Sri lanka

हे ही वाचा :

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

IND vs SL : भारताकडून पराभवानंतर दिग्गज श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीथरन नाराज, म्हणाला…

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.