AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS IPL Mathc Result: लिविंगस्टोन ‘हिरो’ पण वैभवचाही दमदार परफॉर्मन्स, पंजाब किंग्सच्या विजयाची तीन कारणं

CSK vs PBKS IPL Mathc Result: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय.

CSK vs PBKS IPL Mathc Result: लिविंगस्टोन 'हिरो' पण वैभवचाही दमदार परफॉर्मन्स, पंजाब किंग्सच्या विजयाची तीन कारणं
लियाम लिव्हिंगस्टोन-वैभव अरोरा Image Credit source: instagram
| Updated on: Apr 04, 2022 | 12:06 AM
Share

मुंबई: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने आजचा स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली.

  1. लियाम लिविंगस्टोन हे पंजाब किंग्सच्या विजयाचं मुख्य कारण आहे. आज त्याने 32 चेंडूत 60 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. त्याशिवाय गोलंदाजीतही त्याने दोन विकेट काढल्या. संघाला गरज असताना त्याने शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्होची विकेट मिळवून दिली.
  2. वैभव अरोरा या युवा वेगवान गोलंदाजाने आज प्रभावित केलं. त्याने मोईन अली आणि रॉबिन उथाप्पा हे दोन महत्त्वाचे विकेट काढले. 22 धावात चेन्नईचे तीन फलंदाज तंबूत परतले. तिथेच चेन्नई बॅकफूटवर ढकलली गेली. या युवा गोलंदाजाने चार षटकात 21 धावा देत दोन विकेट काढल्या. वैभव अरोराच्या गोलंदाजीच वैशिष्टय ठरलं चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता. त्याने दोन्ही बाजूला चेंडू उत्तम स्विंग केला.
  3. पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने कॅप्टन रवींद्र जाडेजाला बोल्ड केलं. तो सुद्धा सामन्याचा एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी चेन्नईची स्थिती चार बाद 23 झाली. या युवा गोलंदाजाने दोन षटकात 13 धावा देत एक विकेट घेतली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.