AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन रोहित शर्मा याला मोठा झटका, स्टार खेळाडू ‘आऊट’

स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आधीच दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालाय. त्यात आता आणखी एक स्टार बॉलरला दुखापत भोवलीय. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा याचं टेन्शन वाढलंय.

कॅप्टन रोहित शर्मा याला मोठा झटका, स्टार खेळाडू 'आऊट'
| Updated on: Mar 11, 2023 | 8:28 PM
Share

मुंबई | अहमदाबादमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. तर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 3 बाद 289 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रविंद्र जडेजा नाबाद परतले. टीम इंडिया अजूनही सामन्यात 191 धावांनी पिछाडीवर आहे. कॅप्टन रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. मात्र या दरम्यान रोहितला झटका बसलाय. जसप्रीत बुमराह याच्यानंतर आणखी एक स्टार गोलंदाज आऊट झाला आहे. त्यामुळे रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे.

रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मुंबई इंडियन्सकडून आगामी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेला स्टार गोलंदाज हा 16 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसन हॅमस्ट्रिंग इंज्यरी शस्त्रक्रियेमुळे आयपीएलच्या 16 व्या पर्वाला मुकणार आहे. या दुखापतीमुळे रिचर्डसन याला टीम इंडिया विरुद्ध 17 मार्चपासून होणाऱ्या वनडे सीरिजमध्येही खेळता येणार नाही.

रिचर्डसनचं ट्विट

“दुखापत खेळाचा एक भाग आहे, हे एक सत्य आहे मात्र तितकंच निराशाजनक आहे. मी आता अशा स्थितीत आहे जिथे आवडीच्या गोष्टी करु शकतो. मी आधीपेक्षा चांगली कामगिरी करता यावी यासाठी कठोर मेहनेत घेत राहिन”, असं ट्विट रिचर्डसन याने केलं. रिचर्डसन याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 3 कसोटी, 15 वनडे आणि 18 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.

स्पर्धेतून जसप्रीत बुमराह हा आधीच पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यात आता रिचर्डसन याची भर पडली आहे. त्यामुळे 5 वेळची चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स अडचणीत सापडली आहे. त्यामुळे बुमराह आणि रिचर्डसन यांच्या अनुपस्थितीत मुंबई कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात ही 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. तर मुंबई स्पर्धेतील आपला सलामीचा सामना हा 2 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.