AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 GT vs MI Qualifire : मुंबई आणि गुजरातमधील मॅचसाठी लावा ‘हा’ Dream 11 संघ, कॅप्टन रोहितला नाहीतर…

यंदाच्या पर्वातील (IPL 2023 GT vs MI Qualifire) हा सेकंड लास्ट सामना असून ड्रीम 11 साठी खालील दिलेला संघ तुम्हाला घसघशीत यश मिळवून देऊ शकतो.

IPL 2023 GT vs MI Qualifire : मुंबई आणि गुजरातमधील मॅचसाठी लावा 'हा' Dream 11 संघ, कॅप्टन रोहितला नाहीतर...
| Updated on: May 26, 2023 | 4:47 AM
Share

मुंबई : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये यंदाच्या मोसमातील दुसरा प्ले-ऑफमधील सामना रंगणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून गुजरात टायटन्स 15 धावांनी पराभूत झाला होता. आता दोन्ही संघ आपली सर्व ताकद लावताना दिसतील. यंदाच्या पर्वातील हा सेकंड लास्ट सामना असून ड्रीम 11 साठी खालील दिलेला संघ तुम्हाला घसघशीत यश मिळवून देऊ शकतो.

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वातील प्रवास खूप रोमांचक होता. लीग टप्प्यात मेन-इन-ब्लूने 8 गेम जिंकले आणि 14 पैकी 6 गमावले. 16 गुणांसह त्यांच्याकडे गुणतालिकेत चौथ्या स्थानावर येण्यासाठी पुरेशी स्थिती होती. नंतर एलिमिनेटरमध्ये, पलटणने क्वालिफायर 2 मध्ये पोहोचण्यासाठी लखनऊला हरवत इथपर्यंत मजल मारली आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय.

GT vs MI Dream11 टीम

कीपर : इशान किशन

फलंदाज: सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर

अष्टपैलू: हार्दिक पांड्या, कॅमेरून ग्रीन

गोलंदाज: राशिद खान, मोहम्मद शमी, आकाश मधवाल, नूर अहमद

कर्णधार : सूर्यकुमार यादव किंवा शुबमन गिल

उपकर्णधार : तिलक वर्मा किंवा इशान किशन

दोन्ही संघांचे संभाव्य संघ :

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दासून शनाका, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.