DC vs KKR : कॅप्टन ऋषभ पंतच्या 2 मोठ्या घोडचुका, दिल्लीला मोठा फटका

Rishabh Pant : दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात घोडचुका केल्या. सहकाऱ्याने सांगितलेलं न ऐकल्याचा फटका हा संघाला बसला. नक्की काय झालं?

DC vs KKR : कॅप्टन ऋषभ पंतच्या 2 मोठ्या घोडचुका, दिल्लीला मोठा फटका
dc, rishabh pant, ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:55 PM

कोलकाता नाईट रायडर्सने 17 व्या मोसमात आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. केकेआरने दिल्ली विरुद्ध 16 व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 272 धावा केल्या. या दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने 2 मोठ्या घोडचुका केल्या. पंतच्या या चुकांमुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली. पंतकडून त्या चुका नसत्या झाल्या, तर कदाचित चित्र वेगळं असतं. पंतने योग्य वेळेस निर्णय घेतला असता तर केकेआरला 200 पर्यंत रोखता आलं असतं. पंतची नक्की कुठे आणि कधी चूक झाली, ते जाणून घेऊयात.

केकेआरसाठी सुनील नरेन याने ओपनिंग केली. नरेनने 39 बॉलमध्ये 7 चौकार आणि 7 सिक्ससह 85 धावांची झंझावाती खेळी केली. नरेनने 217.95 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. पंतने दक्षता दाखवली असती तर नरेन 21 धावांवरच माघारी परतला असता. मात्र तसं काही होऊ शकलं नाही, कारण पंतची चूक.

मिचेल मार्श याने 21 धावांवर पंतला कॉट बिहाइंडद्वारे आऊट केलं. मात्र पंचाने आऊट दिलं नाही. मार्शने पंतला डीआरएस घेऊन अंपायरच्या निर्णयाला आव्हान द्यायला सांगितलं. मात्र पंतने डीआरएस घेण्यास नकार दिला. त्यामुळे नरीनला जीवनदान मिळालं. पंतने तेव्हाच डीआरएस घेतला असता तर निश्चितच केकेआरला इतकी मोठी धावसंख्या उभारता नसती आली.

दुसरी चूक काय?

दिल्लीचा बॉलर रसीख सलाम याने केकेआर कॅप्टन श्रेयस अय्यर याला पंतच्या हाती कॅच आऊट केलं, पण अंपायरने नाबाद जाहीर केलं. रसीखने पंतला डीआरएससाठी विनंती केली. मात्र पंतने इथेही नकार दिला. श्रेयसने या संधीचा फायदा घेतला. अय्यरने यानंतर 2 सिक्स ठोकले आणि 18 धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.