IPL 2024, DC vs KKR : नाणेफेकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने, फलंदाजी निवडली आणि अशी असेल प्लेइंग 11

आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 16 वा सामना होत आहे. कोलकात्याने आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्लीने 3 सामने खेळले असून 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे.

IPL 2024, DC vs KKR : नाणेफेकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने, फलंदाजी निवडली आणि अशी असेल प्लेइंग 11
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 7:10 PM

आयपीएल 2024 चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. तर दोन पैकी दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा चौथा सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात दिल्लीला दोन सामन्यात पराभव, एका सामन्यात विजय मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. शेवटच्या गेमच्या तुलनेत विकेटमध्ये कोणताही मोठा बदल नाही. दिलेल्या दिवशी काहीही होऊ शकते, प्रक्रियेला चिकटून राहणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे सुनील नरीन पहिल्या 6 षटकांमध्ये गोलंदाजांचा मागोवा घेत आहे, त्यामुळे त्याची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि बाकीच्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे माहित आहे. एक बदल केला असून आंग्रिश रघुवंशी संघात असेल.”

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि त्यांनी ते पुन्हा करावे अशी आमची इच्छा आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी सांघिक संयोजनाबद्दल विचार करत नाही, परंतु आमच्याकडे नेटमध्ये खूप मेहनत करणारे लोक आहेत. संघात एक बदल असून मुकेश जखमी असून त्याची जागा सुमितने घेतली.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दोन्ही संघातील खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा, अल्लाह गझनफर, नितीश राणा.

दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, रिकी भुई, कुलदीप यादव, ऱ्हाय रिचर्डसन, शाई होप, ललित यादव, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.