4,6,6,4,4,4, ऋषभ पंत याची राक्षसी खेळी, वेंकटेश अय्यरला झोडत सलग दुसरं अर्धशतक

Rishabh Pant Fifty Dc vs Kkr : ऋषभ पंत याने वेंकटेश अय्यर याच्या ओव्हरमध्ये खणखणीत सिक्स आणि चौकार ठोकत 28 धावा केल्या. पंतने यासह सलग दुसरं अर्धशतक झळकावलं.

4,6,6,4,4,4, ऋषभ पंत याची राक्षसी खेळी, वेंकटेश अय्यरला झोडत सलग दुसरं अर्धशतक
rishabh pant fifty,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:31 PM

दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात धमाका केला आहे. पंतने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. पंतचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलंय. पंतने दिल्लीच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये वेंकटेश अय्यर याच्या बॉलिंगची पिसं काढली. वेंकटेश अय्यर याच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 4 फोर ठोकून एकूण 28 धावा केल्या आणि अर्धशतक पूर्ण केलं. पंतने 221.74 च्या स्ट्राईक रेटने 23 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 17 वं अर्धशतक ठरलं.

12 वी ओव्हर

वेंकटेश अय्यर कोलकाताकडून दिल्लीच्या डावातील 12 वी ओव्हर टाकायला आला. पंतने डाव साधला आणि टॉप गिअर टाकला. पंतने या ओव्हरमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स खेचले. पंतने या ओव्हरमध्ये अनुक्रमे 4,6,6,4,4,4 असे फटके मारले. पंतने या एका ओव्हरमधील 28 धावांसह अर्धशतकही पूर्ण केलं. पंतचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं. पंतने याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध फिफ्टी ठोकली होती.

हे सुद्धा वाचा

पंतची 55 धावांची खेळी

ऋषभ पंत अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात राहू शकला नाही. पंत अर्धशतकानंतर 5 धावा जोडून आऊट झाला. पंतला कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्थी याने आऊट केलं. वरुणने पंतला कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या हाती कॅच आऊट केलं. पंतने 25 बॉलमध्ये 220 च्या स्ट्राईक रेटने 5 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 55 धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.