IPL 2024, DC vs PBKS : नाणेफेक जिंकत पंजाबने निवडली गोलंदाजी, कर्णधार ऋषभ पंत आणि धवन म्हणाला…
DC vs PBKS Confirmed Playing XI in Marathi: आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. कर्णधार ऋषभ पंतने फलंदाजी निवडली आणि आपलं मत मांडलं. त्यानंतर शिखर धवन यानेही नाणेफेकीवर आपली बाजू स्पष्ट केली.

आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. महाराजा यादविंदर सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे सोपवलं आहे. 14 महिन्यानंतर ऋषभ पंत मैदानात पुनरागमन करत आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर गेल्या पर्वात ऋषभ पंत खेळला नव्हता. मात्र आता रिकव्हर होऊन मैदानात परतला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार पंजाब किंग्सने याने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी निवडली. तसेच निर्णयानंतर आपलं म्हणणं मांडलं. शिखर धवन म्हणाला की, “आम्ही प्रथम मैदानात उतरणार आहोत. नवीन खेळपट्टी आहे. आम्ही नवीन रणनीती केली आहे. आम्ही काही बदल केले आहेत. आम्हाला आता या मैदानाची सवय झाली आहे. आमचा सराव सामना होता. बेअरस्टो, लिव्हिंगस्टोन, कुरान आणि रबाडा हे आमचे चार परदेशी खेळाडू आहेत.”
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतनेही आपली बाजू मांडली. “आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. विकेट थोडी स्लो दिसत आहे. माझ्यासाठी खरोखर ही भावनिक वेळ आहे. फक्त या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. फारसा विचार करत नाही. मला वाटते की आता गेल्या हंगामाची काळजी करायची वेळ नाही.आम्ही चांगली तयारी केली आहे. आमच्या संघात चार परदेशी फलंदाज आहेत. यात होप, मार्श, वॉर्नर, स्टब्सचा समावेश आहे.”
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ 32 वेळा भिडले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची पाहायला मिळाली आहे. पंजाब आणि दिल्लीने प्रत्येकी 16-16 सामने जिंकले आणि गमावले आहेत. गेल्या मोसमात पंजाब किंग्सने दोन्ही सामने जिंकले होते.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग
दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ : ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर- मॅकगर्क , ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.
पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, सिकंदर रझा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, शिवम सिंग , ख्रिस वोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, रिले रोसो, हरप्रीत सिंग भाटिया, ऋषी धवन, शशांक सिंग, तनय थियागराजन, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, विधाथ कवेरप्पा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग
