IPL 2024 : 17 व्या हंगामादरम्यान कॅप्टन बदलणार! या खेळाडूकडे संघाची धुरा
IPL 2024 Captaincy : आयपीएलच्या 17 व्या हंगामादरम्यान एका संघाचा कर्णधार बदलण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात 59 व्या सामन्यांनंतरही प्लेऑफसाठी एकही संघाने क्वालिफाय केलेलं नाही. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स स्पर्धेतून बाहेर पडल्याने उर्वरित 8 संघांमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. काही संघांना फक्त विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबी, लखनऊ, चेन्नई, गुजरात आणि दिल्ली या संघाचं प्लेऑफचं समीकरण हे फार चुरशीचं आहे. त्यामुळे आता एका सामन्यानेही प्लेऑफचं गणित घडणार बिघडणार आहे. अशात या 17 व्या हंगामादरम्यान एका संघाचा कर्णधार बदलणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 12 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. या एकमेव सामन्यासाठीच दिल्लीचा कर्णधार बदलणार आहे. नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर अक्षर पटेल दिल्लीची धुरा सांभाळणार आहे.
ऋषभ पंत तिसऱ्यांदा ओव्हर रेट राखण्यात अपयशी ठरला. राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात कॅप्टन म्हणून ठराविक वेळेत ऋषभ पंतला ओव्हर रेट राखता आला नाही. पंतची ही ओव्हर रेट कायम न राखण्याची तिसरी वेळ ठरली. त्यामुळे बीसीसीआयने 30 लाख रुपयांच्या दंडासह पंतवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. त्यामुळे पंतला पुढील सामना खेळता येणार आहे. त्यामुळे पंतच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
दिल्ली आणि आरसीबीसाठी रविवारी 12 मे रोजी होणारा सामना करो या मरो असा आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमधील जर तरचं आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे कोणत्या एक संघाचं आव्हान कायम राहित. तर एका संघाचा प्रवास या सामन्याच्या निकालासह इथेच संपेल.
अक्षर पटेलकडे दिल्लीचं नेतृत्व
AXAR PATEL WILL LEAD DELHI TOMORROW vs RCB…!!! [PTI] pic.twitter.com/p0chjhnw0s
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2024
दिल्ली कॅपिट्ल्स : अक्षर पटेल, ऋषभ पंत , डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.
