SRH Vs RCB : विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Virat Kohli IPL 2024 : विराट कोहलीने आपल्या नावावर मोठा रेकॉर्ड केला आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

SRH Vs RCB : विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
virat kohli rcb ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 9:08 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. विराटने 14 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक झळकावलं. विराटने 135.14 च्या स्ट्राईक रेटने 4 चौकार आणि 1 सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. विराटच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 53 आणि टी 20 क्रिकेटमधील 103 वं अर्धशतक ठरलं. मात्र त्यानंतर विराटच्या या खेळीला पूर्णविराम लागला. विराट 43 बॉलमध्ये 51 धावांवर आऊट झाला. मात्र विराटने या खेळीदरम्यान इतिहास रचला. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला.

विराट कोहलीने हैदराबाद विरुद्ध 21 वी धाव पूर्ण करताच त्याच्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात 400 धावा पूर्ण झाल्या. विराट कोहली यासह आयपीएलच्या 10 वेगवेगळ्या हंगामात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. विराट कोहली याच्याआधी ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना याने सलग 9 हंगामात 400 धावा करण्याचा कारनामा केला होता. इतकंच नाही, तर विराटने आयपीएलमध्ये ओपनर म्हणून 4 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. विराट आयपीएलमध्ये ओपनर म्हणून 4 हजार धावा करणारा एकूण चौथा आणि दुसरा भारतीय ठरला. विराटच्या आधी शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल या तिघांनी ही कामरगिरी केली होती.

आयपीएलमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावा (डाव)

केएल राहुल – 3 हजार 965 धावा (93) विराट कोहली – 4 हजार 9 धावा (107*) ख्रिस गेल – 4 हजार 480 धावा (122) डेव्हिड वॉर्नर – 5 हजार 909 धावा (162) शिखर धवन – 6 हजार 362 धावा (202)

विराटचा  10 वेगवेगळ्या हंगामात 400 पार

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.