IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबाबत वीरेंद्र सेहवागने केलं झोंबवणारं विश्लेषण, म्हणाला..
आयपीएल स्पर्धेत दरवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जेतेपदाचा प्रश्न असतो. यंदा तरी जेतेपद जिंकणार का? 17 पर्वात काही हाती लागलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. वीरेंद्र सेहवाने आरसीबीच्या जेतेपदाबाबत चाहत्यांचं मन दुखवणारं भाष्य केलं आहे. तसेच नेमकं काय चुकतंय याबाबतही सांगितलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची घरच्या मैदानावर स्थिती नाजूक असल्याचं दिसून आलं आहे. सलग तिसऱ्यांदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 11 चेंडू आणि 5 गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या पराभवाला फलंदाज कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 14 षटकांचा सामना झाला आणि आरसीबीला फक्त 95 धावा करता आल्या. कर्णधार रजत पाटिदारने 23, टिम डेव्हिडने 50 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. आरसीबीची कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आरसीबीच्या फलंदाजांनावर निशाणा साधला आहे. मधल्या फळी ही कमकुवत बाजू असल्याचं बोललं आहे.
क्रिकबझवर सामन्याचे विश्लेषण करताना म्हणाला की, ‘आरसीबीचा मधला क्रम ही एक मोठी कमकुवत बाजू आहे. जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कृणाल पांड्या यांनी निराश केलं. तिघांचं योगदान काही खास नाही. म्हणूनच बंगळुरूची अशी स्थिती झाली आहे. आरसीबी विराट कोहली, फिल साल्ट आणि रजत पाटीदार यांच्यावर अवलंबून आहे. टिम डेव्हिड देखील खालच्या फळीत चांगली कामगिरी करत आहे. पण ज्या दिवशी वरील तीन फलंदाज अपयशी ठरले. त्या दिवशी बंगळुरूला संघर्ष करावा लागला. पंजाबविरुद्धही अशीच परिस्थिती दिसून आली.’
‘लिव्हिंगस्टोन हा दुसरा मॅक्सवेल असेल.जितेश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनीही काहीही केले नाही. जेव्हा टॉप ऑर्डर कोसळते तेव्हा मधल्या फळीतील एखाद्याला जबाबदारी घ्यावी लागते. टिम डेव्हिड चांगला खेळत आहे पण त्याला कमी चेंडू मिळत आहेत. पण मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त चेंडू मिळत असले तरी ते लवकर बाद होत आहेत. या तिघांनी फलंदाजीत सातत्याने योगदान दिले पाहिजे. तरच आपण घरच्या मैदानावर जिंकू शकतात. अन्यथा, आपल्याला प्रार्थना करावी लागेल की विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी 15 षटके खेळावीत आणि शेवटच्या 5 षटकांमध्ये चेंडू मारून जास्तीत जास्त धावा काढाव्यात.’ असं विश्लेषण सेहवागने केलं. सेहवाग पुढे म्हणाला की, जर हे असेच चालू राहिले तर आरसीबी ट्रॉफी जिंकण्याची शक्यता कमी आहे.
