AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK Toss : मुंबईने वानखेडेत टॉस जिंकला, रोहित-धोनी खेळणार? पाहा प्लेइंग 11

Mumbai Indians vs Chennai Super Kings Toss And Playing 11 : रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी वानखेडेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या टॉसनंतर काय निश्चित झालं.

MI vs CSK Toss : मुंबईने वानखेडेत टॉस जिंकला, रोहित-धोनी खेळणार? पाहा प्लेइंग 11
Hardik Pandya MI vs CSK IPL 2026Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 23, 2026 | 7:46 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टाकला जाणार आहे. त्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये 7 वाजता टॉस करण्यात आला. मुंबईच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आम्हीही फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता असं टॉस गमावल्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला. त्यामुळे आता हार्दिकचा फिल्डिंगचा निर्णय किती योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वानखेडे स्टेडियममधील 2026 वर्षातील महत्त्वाची आकडेवारी

वानखेडे स्टेडियममध्ये 2026 वर्षांत आतापर्यंत एकूण 11 पैकी 7 सामन्यांत 200 पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. तसेच या मैदानातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 194 इतकी आहे. हे स्टेडियम आकाराने लहान असल्याने 200 पेक्षा अधिक धावा सहज होतात. तसेच 2026 वर्षात या वानखेडेत 11 पैकी 6 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झालाय. तर 5 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारलीय. त्यामुळे आता 12 व्या सामन्यात कुणाच्या बाजूने निकाल लागतो निकालानंतरच स्पष्ट होईल.

मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं. तर चेन्नईने काही बदल केलेत. मात्र महेंद्रसिंह धोनी याचं कमबॅक झालेलं नाही. क्रिकेट चाहत्यांना रोहित-धोनीच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. मात्र चाहत्यांची निराशा झालीय. रोहितचा दुखापतीमुळे सलग तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर महेंद्रसिंह धोनीला दुखापतीमुळे 19 व्या हंगामात एकही सामना खेळता आलेला नाही. त्यामुळे आता धोनी आणि रोहित चाहत्यांना त्यांच्या स्टार खेळाडूंच्या कमबॅकची आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजनप्रीत सिंग आणि मुकेश चौधरी.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड