IPL 2024 Orange Cap: ऋषभ पंतची टॉप 5 मध्ये एन्ट्री, ऑरेंज कॅप कुणाकडे?

IPL 2024 Orange Cap, Highest Run Scorer : ऑरेँज कॅपसाठी आता चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 16 सामन्यांनंतर मानाची ऑरेँज कॅप कुणाकडे आहे?

IPL 2024 Orange Cap: ऋषभ पंतची टॉप 5 मध्ये एन्ट्री, ऑरेंज कॅप कुणाकडे?
rishabh pant dc,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 1:14 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात 3 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये कोलकातने विजय मिळवला. कोलकाताचा हा सलग तिसरा विजय ठरला. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला ऑलआऊट 166 धावाच करता आल्या.

दिल्लीसाठी कॅप्टन ऋषभ पंत याने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्स याने 54 धावा जोडल्या. डेव्हिड वॉर्नर याने 18 आणि पृथ्वी शॉ याने 10 धावा केल्या. दोघे झिरोवर आऊट झाले. तर दिल्लीकडून या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीचा पराभव झाला. मात्र ऑरेँज कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या 2 फलंदाजांना फायदा झालाय. पहिल्या पाचात दिल्लीच्या 2 जणांची एन्ट्री झालीय. तर पहिले 2 फलंदाज कायम आहेत.

आरसीबीचा विराट कोहली याच्याकडे 16 व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आहे. राजस्थानच्या रियान पराग याला दुसरं स्थान कायम राखण्यात यश आलंय. हैदराबादचा हेन्रिक क्लासने तिसऱ्या स्थानी आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत आणि ओपनर डेव्हीड वॉर्नर विराजमान झाले आहेत. पंतने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात या मोसमातील सलग दुसरं अर्धशतक ठोकल्याचा त्याला फायदा झालाय. तर वॉर्नरनेही पुन्हा पहिल्या पाचात स्थान मिळवलंय.

पंतने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. पंतचं 15 महिन्यांच्या कमबॅकनतंर हे अर्धशतक लगावलं होतं. तर त्यानंतर आता कोलकाता विरुद्ध फिफ्टी ठोकली. पंत आणि वॉर्नरमुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरन आणि क्विंटन डी कॉक या दोघांना फटका बसलाय. दोघेही टॉप 5 मधून बाहेर पडलेत.

ऑरेँज कॅप विराटकडेच, टॉप 5 मध्ये कोण?

ipl 2024 orange cap 3 april stats,

 

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.