IPL 2024 Points Table : कोलकाताची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला झटका

IPL 2024 Points Table 16th Match : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 3 सामने जिंकले आहेत. केकेआरने या विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

IPL 2024 Points Table : कोलकाताची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला झटका
Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 2:51 PM

कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमात कोलकाताने सुनील नारायण याच्या विस्फोटक 85 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 272 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 273 धावांचं आव्हान मिळालं. दिल्लीला सामना जिंकता आला नाही. मात्र दिल्लीने सामना एकतर्फी होऊ दिला नाही. कॅप्टन ऋषभ पंत याने 55 आणि ट्रिस्टन स्टब्स याच्या 54 धावा केल्या. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. दिल्लीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. कोलकाताने 17.2 ओव्हरमध्ये दिल्लीला 166 धावांवर गुंडाळलं आणि 106 धावांनी विजय मिळवला.

कोलकाताला या विजयासह मोठा फायदा झाला आहे. तर राजस्थान रॉयल्सला झटका लागला आहे. कोलकाताने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली. तर राजस्थानची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच कोलकाताचा नेट रनरेटही चांगला वाढला आहे.  राजस्थान या सामन्याआधी पहिल्या आणि केकेआर दुसऱ्या स्थानी होती. मात्र सामन्यातनंतर कोलकाताने टॉप मारला. केकेआरचा नेट रनरेट आधी 1.047 असा होता. विजयानंतर हा नेट रनरेट 2.518 इतका झाला आहे.

दिल्लीला फटका

दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दिल्लीला या पराभवाचा फटका बसलाय. दिल्लीला पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचं नुकसान झालंय. दिल्ली आधी सातव्या स्थानी होती. दिल्ली सामन्यानंतर नवव्या स्थानी पोहचली आहे. दिल्लीचा सामन्याआधी -0.016 असा नेट रनरेट होता तो आता 1.347 असा झाला आहे.

कोलकाता विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.