IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपच्या रेसमध्ये हा खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या कोण कोण आहेत दावेदार

आयपीएल 2024 स्पर्धेत 16 सामने झाले असून गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पर्पल कॅपचा मानकरी जैसे थेच आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यानंतरही यात कोणताही बदल झालेला नाही. चला जाणून कोण कोण आहेत यादीत..

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपच्या रेसमध्ये हा खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या कोण कोण आहेत दावेदार
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:28 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 16 सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची पिसं काढली. 20 षटकात 7 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा संघ 166 धावा करू शकला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स 106 धावांनी पराभव झाला. त्याचा रनरेटवर जबरदस्त फटका बसला आहे. दुसरीकडे, या सामन्यातही पर्पल कॅपचा मान कोणीही हिरावून घेऊ शकला नाही. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा बांगलादेशचा मुस्तफिझुर रहमान या यादीत टॉपला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पर्पला कॅप मुस्तफिझुर रहमानच्या डोक्यावर आहे. 16 सामन्यानंतरही हा मान कोणी मिळवू शकलेलं नाही.

मुस्तफिझुर रहमानने 3 सामन्यात 12 षटकं टाकत 7 गडी बाद केले आहेत. इकोनॉमी रेट 8.83 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव आहे. त्याने 2 सामन्यात 6 गडी बाद केले असून इकोनॉमी रेट 5.12 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर युझवेंद्र चहल असून त्यानेही 6 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 5.50 आहे. चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा असून त्याने 3 सामन्यात 7.75 इकोनॉमी रेटने 6 गडी बाद केले. पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा खलिल अहमद आहेत त्याने 8.18 च्या इकोनॉमी रेटने 6 गडी बाद केले आहेत. वरील आकडेवारी पाहता पुढे पर्पल कॅपची चुरस आणखी रंगतदार होणार आहे.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

आयपीएल स्पर्धेत खलिल अहमद हा एकमेक गोलंदाज आहे. त्याने एक षटक निर्धाव टाकलं आहे. तसेच सर्वाधिक 48 चेंडू निर्धाव टाकले आहेत. निर्धाव चेंडू टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यश दयाल दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 41 चेंडू निर्धाव चेंडू टाकले. तर मुंबई इंडियन्सचा क्वेना माफाका हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 66 धावा दिल्या. तर मुंबई इंडियन्सचा आकाश मढवाल हा 6.66 एव्हरेजने गोलंदाज ठरला आहे.

Non Stop LIVE Update
सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत... संविधानाच्या मुद्द्यावरून दादा भडकले
सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत... संविधानाच्या मुद्द्यावरून दादा भडकले.
ठाकरेंना अडीच वर्ष कोंडलं, दिसायला भोळ्या; कुणाची रश्मी ठाकरेंवर टीका
ठाकरेंना अडीच वर्ष कोंडलं, दिसायला भोळ्या; कुणाची रश्मी ठाकरेंवर टीका.
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?.
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....