ISPL सीझन 3 चा नवीन विक्रम; 10 कोटी रुपयांचा खर्च करत मेगा लिलावासह स्थापन केला नवीन बेंचमार्क
ISPL Season 3 : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या भारतातील अग्रगण्य टेनिस-बॉल T10 क्रिकेट स्पर्धेने सीझन 3 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई, 10 डिसेंबर, 2025: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL), भारतातील अग्रगण्य टेनिस-बॉल T10 क्रिकेट स्पर्धेने सीझन 3 साठी खेळाडूंचा लिलाव केला. यात 144 खेळाडूंवर 10 कोटी रुपये खर्च केले गेले. मंगळवारी मुंबईत झालेल्या या लिलावात आठ फ्रँचायझी परस्परांना भिडल्या. या लिलावात विजय पावले हा सर्वाधिक चर्चेतील खेळाडू ठरला. गतविजेत्या माझी मुंबईने लीगमधील सर्वाधिक रक्कम 32.50 लाख रुपये मोजत त्याला स्वतःकडे खेचून घेतले. पश्चिम विभागातील या अष्टपैलू खेळाडूने गेल्या हंगामात मुंबईला जेतेपद जिंकून दिले होते. पश्चिम विभागातीलच दुसरा खेळाडू केतन म्हात्रेला चेन्नई सिंगम्सने राईट टू मॅच (RTM) कार्डद्वारे 26.40 लाख रुपये खर्चून कायम ठेवले, ज्यामुळे तो दिवसातील सर्वाधिक बोलीचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.
अहमदाबाद लायन्स आणि दिल्ली सुपरहीरो या दोन नवीन संघांचा या लीगमध्ये समावेश झाल्यामुळे, सीझन 3 हा आतापर्यंतचा सर्वात स्पर्धात्मक ठरणार आहे. 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची तिकिटे लवकरच BookMyShow वर उपलब्ध होतील. या वर्षीच्या लिलावात आयएसपीएलचा वाढता प्रभाव दिसून आला, 101 शहरांमधील 408 खेळाडूंना लिलावात उतरवले गेले.
आयएसपीएल कोअर कमिटीचे सदस्य सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, मीनल अमोल काळे, सूरज सामत आणि दीपक चौहान, अध्यक्ष – संचालन यांच्यासह क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या हस्ती या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. उपस्थित संघ मालकांमध्ये अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सैफ अली खान आणि अक्ष कांबोज (कोलकाता टायगर्स), हृतिक रोशन आणि दिवी डांगी (बेंगळुरू स्ट्रायकर्स), नीती अगरवाल (माझी मुंबई), झायद नोमन (फाल्कन रायझर्स हैदराबाद), राजदीप गुप्ता (चेन्नई सिंघम्स) आणि अजय देवगण, जाहिदमोहमद विजापुरा आणि इजाझहमद खानूसिया (अहमदाबाद लायन्स) यांच्यासह सलमान खान आणि अर्पिता खान शर्मा (दिल्ली सुपरहीरोज) हे उपस्थित होते.
आयएसपीएल सीझन 3मध्ये चाहत्यांच्या सहभागाची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज असलेल्या ह्युमनॉइड इनोव्हेशन – ‘स्ट्रीट स्टार’च्या अधिकृत अनावरणाने या दिवसाची शानदार सुरुवात झाली. 19 वर्षांखालील गटात जोरदार बोली लागली. या गटात अंकित यादव सर्वात महागडा तरुण खेळाडू ठरला, त्याला कोलकाता टायगर्सने 6.50 लाख रुपयांना खरेदी केले. दरम्यान, 16 वर्षीय रुद्र पाटीलने सीझन 3चा सर्वात तरुण खेळाडू म्हणून इतिहास रचला, त्याला श्रीनगर के वीरने त्याच्या 3 लाख रुपयांच्या मूळ प्राइसवर निवडले.
लिलावादरम्यान आयएसपीएलचे कोअर कमिटी सदस्य सचिन तेंडुलकर म्हणाले: “मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण तो माझा ध्यास होता. म्हणूनच, आयएसपीएलमधील सर्व खेळाडूंना माझा सल्ला आहे की, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. काल तुम्ही जे कोणी होतात, त्यापेक्षा आज तुम्ही जास्त चांगले होऊ शकता का, हा प्रश्न स्वतःलाच विचारा. हा एक असा मंच आहे, जिथे तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता, प्रत्येकजण तुम्हाला पाहात असतो आणि तुमच्या प्रतिभेचा आनंद घेत असतो. जगाने तुम्हाला पाहावे म्हणून नाही तर जगाला पाहण्यासाठी तुम्ही डोंगरावर चढा.”
आयएसपीएलचे कोअर कमिटी सदस्य आशिष शेलार म्हणाले: “खेळाडूंमध्ये असलेले कौशल्य समोर आणण्यासाठी आयएसपीएलची निर्मिती करण्यात आली आहे. लाखो तरुण खेळाडू ही संधी घेत असल्याचे पाहून आनंद होतो. व्यावसायिक, भविष्य-केंद्रित दृष्टिकोनाने आम्ही हा मंच तयार केला आहे आणि त्याचा दृश्य परिणाम आधीच दिसून येतो आहे. आयएसपीएल दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत जाईल आणि देशभरातील आणखी प्रतिभा शोधेल, याचा मला विश्वास आहे.”
आयएसपीएलच्या कोअर कमिटी सदस्या मीनल अमोल काळे म्हणाल्या, “आयएसपीएल लिलाव हा अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंसाठी करिअरला दिशा देणारा क्षण आहे. ही लीग अशा नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक अत्यंत गरजेचा असा मंच प्रदान करते, ज्यांना राष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळण्याची शक्यता नाही. आम्हाला आशा आहे की, या हंगामात निवडलेला प्रत्येक खेळाडू या संधीचा सर्वोत्तम वापर करेल, कठोर परिश्रम घेईल आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने आयएसपीएलच्या माध्यमातून एक पाऊल पुढे जाईल.”
आयएसपीएलचे कोअर कमिटी सदस्य आणि लीग कमिशनर सूरज समत म्हणाले: “आतापर्यंतच्या लिलावातील हा सीझन सर्वात स्पर्धात्मक होती. फ्रँचायझींचे धोरण स्पष्ट होते आणि गुगली पॉवर, आरटीएम तसेच रिटेन्शनच्या सुविधेमुळे या प्रक्रियेला खोली मिळाली. या सीझनमधील सगळे संघ संतुलित आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की, चाहत्यांना सुरतमध्ये उत्तम खेळ तर पाहता येईलच आणि मनोरंजक हंगामही अनुभवता येईल.”
सलमान खानच्या मालकीचा दिल्ली सुपरहिरो आणि अजय देवगणच्या मालकीचा अहमदाबाद लायन्स या दोन संघांसह या लीगमध्ये आठ संघांचा समावेश झाला आहे. माझी मुंबई (अमिताभ बच्चन), टायगर्स ऑफ कोलकाता (सैफ अली खान आणि करीना कपूर खान), श्रीनगर के वीर (अक्षय कुमार), चेन्नई सिंघम्स (सुरिया ), बेंगळुरू स्ट्रायकर्स (हृतिक रोशन) आणि फाल्कन रायझर्स हैदराबाद (राम चरण) यांच्यात आता सलमान खान आणि अजय देवगणच्या संघांचा समावेश झाला आहे. आयएसपीएलने असेही जाहीर केले आहे की, सीझन 3 मधील सर्वात व्हॅल्युएबल खेळाडूला (एमव्हीपी) पोर्श 911 मिळेल. भारतीय खेळातील सर्वात मौल्यवान वैयक्तिक पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार असेल.
सर्वोत्तम बोली लागलेले 5 खेळाडू
- विजय पावले – 32.50 लाख रूपये (माझी मुंबई) आरटीएम
- केतन म्हात्रे – 26.40 लाख रूपये (चेन्नई सिंघम्स) आरटीएम
- राजेंद्र सिंग – 26.10 लाख रूपये (बेंगळुरू स्ट्रायकर्स)
- संजय कनोजिया – 24.55 लाख रूपये(अहमदाबाद लायन्स)
- सैफ अली – 23.65 लाख रूपये (टायगर्स ऑफ कोलकाता)
सर्वोत्तम 5 फलंदाज
- केतन म्हात्रे – 26.40 लाख रूपये (चेन्नई सिंघम्स) आरटीएम
- संजय कनोजिया – 24.55 लाख रूपये (अहमदाबाद लायन्स)
- सैफ अली – 23.65 लाख रूपये (टायगर्स ऑफ कोलकाता)
- योगेश पेणकर – 22.45 लाख रूपये(फाल्कन रायझर्स हैदराबाद)
- फरदीन काझी – 22.30 लाख रूपये (बेंगळुरू स्ट्रायकर्स)
सर्वोत्तम 5 गोलंदाज
- राजेंद्र सिंग – 26.10 लाख रूपये (बेंगळुरू स्ट्रायकर्स)
- अनुराग सरशर – 19.20 लाख रूपये (चेन्नई सिंघम्स)
- विकी भोईर – 12 लाख रूपये (फाल्कन रायझर्स हैदराबाद)
- निझाम अली – 9 लाख रूपये (अहमदाबाद लायन्स)
- विवेक शेलार – 7 लाख रूपये (टायगर्स ऑफ कोलकाता)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू
- विजय पावले – 32.50 लाख रूपये (माझी मुंबई) आरटीएम
- सरोज परमाणिक – 20.60 लाख रूपये (टायगर्स ऑफ कोलकाता)
- प्रवीण कुमार – 16.50 लाख रूपये (फाल्कन रायझर्स हैदराबाद)
- विश्वजीत ठाकूर – 15 लाख रूपये (फाल्कन रायझर्स हैदराबाद)
प्रत्येक संघातील खेळाडू
1. माझी मुंबई: एकूण खर्च – ₹ 1,36,95,000. शिल्लक – 13.05 लाख रूपये
अभिषेक कुमार दलहोर (रिटेन केलेला खेळाडू, 26.65 लाख), विजय पावले (32.50 लाख), एजाज बेपारी (16 लाख), थॉमस डायस (10 लाख), बंटी पटेल (8 लाख), गजेंद्र गोस्वामी (5.80 लाख), इजाज अहमद (4.40 लाख), कबीर सिंग (3.40 लाख), वेदांत देसाई (3.20 लाख), दर्शन बांदेकर (3 लाख), जिग्नेश राजपूत (3 लाख), ईशांत शर्मा (3 लाख), जयदीप भोंडीवले (3 लाख), राजा कुसुम (3 लाख), महेंद्र चंदन (3 लाख), मनीष वाघमारे (3 लाख), मोहम्मद जीशान (3 लाख), अभिषेक पटेल (3 लाख).
2. चेन्नई सिंघम्स: एकूण खर्च – ₹ 1,41,77,000; शिल्लक – 8.23 लाख
जगन्नाथ सरकार (रिटेन केलेला खेळाडू, 20.02 लाख), केतन म्हात्रे (26.40 लाख), अनुराग सरशार (19.20 लाख), अंकुर सिंग (11 लाख), राजेश सोरटे (10 लाख), मोहम्मद नदीम (5.50 लाख), आशिष पाल (5.25 लाख), आर्यन खारकर (4 लाख), अमन यादव (3.80 लाख), धीरज सिंग (3.60 लाख), संभाजी पाटील (3 लाख), नागेश वाडेकर (3 लाख), सरफराज खान (12 लाख), अंकित यादव (3 लाख), मोयोद्दीन शेख (3 लाख), किसन सातपुते (3 लाख), सुनील कुमार (3 लाख), गणेश शिल्लिक्यतार (3 लाख)
3. टायगर्स ऑफ कोलकाता: एकूण खर्च – ₹ 1,40,50,000; शिल्लक – 9.5 लाख
भावेश पवार (रिटेन केलेला खेळाडू, 11.05 लाख), सैफ अली (23.65 लाख), सरोज परमाणिक (20.60 लाख), रजत मुंढे (15.05 लाख), विवेक शेलार (7 लाख), महेश नानगुडे (7.50 लाख), करण मोरे (5.75 लाख), पवन केणे (6.50 लाख), अंकित यादव (6.50 लाख), कृष्णा गवळी (8.50 लाख), हृतिक पाटील (4.60 लाख), विवेक मोहनन (4.40 लाख), शिवम कुमार (3.80 लाख), हिमांशु पाटील (3.60 लाख), प्रबजोत सिंग (3 लाख), अरीश खान (3 लाख), फिरदोस आलम (3 लाख), किरण पवार (3 लाख).
4. फाल्कन रायझर्स हैदराबाद: एकूण खर्च – ₹1,46,60,000; शिल्लक – 3.4 लाख
मन्सूर केएल (रिटेन केलेला खेळाडू, 4.50 लाख), योगेश पेणकर (22.45 लाख), श्रेयश कदम (19.80 लाख), प्रवीण कुमार (16.50 लाख), विश्वजीत ठाकूर (15 लाख), विकी भोईर (12 लाख), विशाल यादव (10 लाख), वरुण कुमार (6.75 लाख), नितीन अनिल माटुंगे (6 लाख), संस्कार ध्यानी (4.80 लाख), प्रशांत घरत (4.40 लाख), आकाश गौतम (4.20 लाख), लोकेश (4 लाख), प्रितपाल सिंग (4 लाख), आशीर्वाद ठाकूर (3.20 लाख), रुतिक गजर (3 लाख), पप्पू तोडकर (3 लाख), विकी पुजारी (3 लाख).
5. श्रीनगर के वीर: एकूण खर्च – ₹ 59,80,000; शिल्लक – 90.2 लाख
धनंजय भिंताडे (8 लाख), मॅकमिलन गोविंद (3.20 लाख), प्रज्योत अंभिरे (3.20 लाख), हर्ष भोईर (3 लाख), मंगेश वैती (3 लाख), आर्यन नाईक (3 लाख), रुद्र पाटील (3 लाख), हर्ष अडसूळ (3 लाख), देवेंद्र काळे (3 लाख), राजू मुखिया (3 लाख), दिलीप बिंज्वा (3.40 लाख), आदित्य विक्रम (3 लाख), मिनाद मांजरेकर (3 लाख), साहिश म्हात्रे (3 लाख), अमोल निलुगडे (3 लाख), शाहरुख खान (3 लाख), अरविंद कुमार (3 लाख), मोहम्मद राझी (3 लाख).
6. बेंगळुरू स्ट्रायकर्स: एकूण खर्च – ₹1,43,85,000; शिल्लक – 6.15 लाख
राजेंद्र सिंग (26.10 लाख), फरदीन काझी (22.30 लाख), कृष्णा पवार (15.75 लाख), सुमीत ढेकळे (15.5 लाख), ओंकार केणी (7 लाख), अमित पांडे (6.50 लाख), विजय कुमार (6.25 लाख), भूषण गोळे (6.25 लाख), बदी राजेश नारायण (5.60 लाख), मोहित राठोड (5 लाख), इमरोज खान (4.2 लाख), दिव्येंदू पॉल (4 लाख), इमदाद पाशा (4 लाख), ओंकार भद्रिके (3.40 लाख), रविराज गायकवाड (3 लाख), प्रदीप मिश्रा (3 लाख), डेव्हिड गोगोई (3 लाख), शाहिद मीर (3 लाख).
7. दिल्ली सुपरहीरोज: एकूण खर्च – ₹ 59,60,000; शिल्लक – 90.4 लाख
प्रथमेश पवार (5.80 लाख), आकाश तारेकर (4.20 लाख), नशांत कुमार (4 लाख), आकाश जागिड (3.40 लाख), जयेश पाटील (3.20 लाख), श्रवण मिश्रा (3 लाख), सुभाजित जाना (3 लाख), तबरेज अहमद मुगल (3 लाख), आकाश सिंग (3 लाख), मोहम्मदसलीम शाहपूर (3 लाख), पद्मेश म्हात्रे (3 लाख), विनायक भोईर (3 लाख), विश्वजीत म्हात्रे (3 लाख), धीरज भोईर (3 लाख), नितेश माळी (3 लाख), साहिल लोंगाळे (3 लाख), फिरोज शेख (3 लाख), अमेय पाटील (3 लाख).
8. अहमदाबाद लायन्स: एकूण खर्च – ₹ 1,40,50,000; शिल्लक – 9.5 लाख
संजय कनोजिया (24.55 लाख), अमित नाईक (17.50 लाख), सिकंदरभाई भट्टी (16.50 लाख), प्रदीप पाटील (14 लाख), प्रथमेश ठाकरे (12.15 लाख), जिग्नेश पटेल (8.50 लाख), बिरेंद्र राम (6.50 लाख), फिरास मोहम्मद (4.60 लाख), अविनाश राणा (3.20 लाख), निझाम अली (9 लाख), मजिद युसूफ शेख (3 लाख), अमेय लाड (3 लाख), आसिफ लुहार (3 लाख), झैद खान (3 लाख), दिबाकर गायेन (3 लाख), फरमान खान (3 लाख), आशिक अली बी एस (3 लाख), जयवीर परमार (3 लाख).
