AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : मालिका गमावली तरी फरक पडणार नाही! रवींद्र जडेजाचं विचित्र म्हणणं ऐकलं का?

गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. भारताच्या हातात पाचव्या दिवशी 8 विकेट आहेत. तर विजयासाठी 522 धावांची गरज आहे. पण असं असताना रवींद्र जडेजाने वेगळाच तर्क मांडला आहे.

IND vs SA : मालिका गमावली तरी फरक पडणार नाही! रवींद्र जडेजाचं विचित्र म्हणणं ऐकलं का?
IND vs SA : मालिका गमावली तरी फरक पडणार नाही! रवींद्र जडेजाचं विचित्र म्हणणं ऐकलं का? Image Credit source: PTI
| Updated on: Nov 25, 2025 | 10:03 PM
Share

कोलकाता कसोटीनंतर भारतीय संघ गुवाहाटी कसोटीतही पराभवाच्या वेशीवर आहे. विजयाचं पारडं पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकलेलं आहे. कारण 549 धावांचं लक्ष्य गाठणं काही भारताला शक्य नाही. कारण या धावांचा पाठलाग करताना भारताने 27 धावांवर 2 विकेट गमावल्या आहेत. आता शेवटच्या दिवशी भारताकडे 8 विकेट असून 522 धावा करायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजाला या पराभवाचं काहीच सोयरसूतक दिसत नाही. उलट त्याचा विचित्र तर्क ऐकून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पराभवाने काहीच फरक पडणार नाही, असंही रवींद्र जडेजा सांगून गेला. रवींद्र जडेजा नेमकं काय म्हणाला ते जाणून घेऊयात…

रवींद्र जडेजाने नेमकं काय सांगितलं?

गुवाहाटी कसोटीत रवींद्र जडेजाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, ‘मला नाही वाटक की याचा पुढच्या मालिकेवर काही परिणाम होईल. पण एक क्रिकेटपटू म्हणून मी कोणतीही मालिका पराभूत होऊ इच्छित नाही. खासकरून भारतात.. म्हणून मला आशा आहे की आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ देऊन क्रिकेट खेळू. आम्ही शेवटच्या दिवशी चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आशा आहे की आम्ही कसोटी सामना वाचवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी आम्ही सामना ड्रॉ करू शकू. ते आमच्यासाठी फायदेशीर राहील.’

रवींद्र जडेजाने सांगितलं की, भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. ते आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. ‘टीममध्ये युवा खेळाडू आहेत आणि ते शिकत आहेत. त्यांचं करिअर आताच सुरु झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला सुरूवात वाटते तितकी सोपी नसते.’ असं जडेजा म्हणाला. इतकंच काय तर पुढे त्याने खेळाडूंच्या अनुभवावर बोट ठेवलं. जेव्हा एखादा संघ घरच्या मैदानावर पराभूत करतो तेव्हा त्यांच्या अनुभवाची उणीव स्पष्ट दिसते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही मालिका तरुण खेळाडूंसाठी एक धडा म्हणून काम करेल आणि भविष्यात त्यांना मदत करेल, अशा त्याने कानपिचक्या दिल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...