IPL 2021: केकेआरच्या अडचणीत वाढ, महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर, भारतासाठी रवाना

यंदाचा सीजन बऱ्याच संघासाठी खराब चालला आहे. केकेआर संघही स्पर्धेत पुनरागमन करत असतानाच त्यांना चेन्नईकडून दोन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता त्यांचा महत्त्वाचा खेळाडूही स्पर्धेबाहेर झाला आहे.

IPL 2021: केकेआरच्या अडचणीत वाढ, महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर, भारतासाठी रवाना
केकेआर संघ

मुंबई: यूएईमध्ये आय़पीएलच्या उर्वरीत हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा (IPL 2021) हा दुसरा हंगाम कोलकाता नाइट रायडर्ससाठी (KKR) चांगल्याप्रकारे सुरु झाला. त्यांनी आतापर्यंत युएईमध्ये खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान यामुळे ते  पॉइंट्स टेबलमध्येही चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. पण नुकत्याच झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्या (KKR vs CSK) त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात त्यांना दोन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता आणखी एक वाईट बातमी संघासाठी आली आहे. संघाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान पुढील सहा महिनेतरी तो मैदानावर परतणार नाही अशी चिन्ह सध्या दिसत आहेत.

पीटीआयच्या माहितीनुसार, कुलदीपला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. रिपोर्टमध्ये बीसीसीआयशी संबधित एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, “हो, आम्हाला कुलदीप यादवच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. क्षेत्ररक्षणाचा सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरीत आय़पीएलमध्ये थांबू शकत नाही. त्यासाठी त्याला भारतात परत बोलवण्यात आले आहे.”

4 ते 6 महिनेतरी मैदानात परतणं अशक्य

समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय स्पिनर कुलदीपची मुंबई येथे गुडघ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील किमान सहा महिने तरी त्याला संघात पुन्हा येते येणेे अवघड आहे. त्यामुळे तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवू शकणार नाही. दरम्यान गुडघ्याची दुखापत गंभीर असल्याने त्यासाठी योग्य उपचार फार गरजेचे असतात. फिजीओथेरपीच्या सत्रांना जाऊन यावर उपचार घेणं फार गरजेचं असल्याचंही एका सूत्रांने सांगितलं आहे.

दोन वर्षांपासून IPL मध्ये संधी नाही

भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिेकटमध्ये मिळून 174 विकेट्स घेणाऱ्या 26  वर्षीय कुलदीपला नुकत्याच श्रीलंका दौऱ्यासाछी वनडे आणि टी-20 संघात स्थान मिळालं होतं. पण त्याठिकाणी त्याने खास प्रदर्शन न केल्याने सर्वांचीच निराशा झाली. 4 सामन्यात त्याने केवळ 4 विकेटच घेतल्या. दरम्या या सर्वामुळेत कुलदीपला आयपीएल 2021 मध्ये एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही, दरम्यान 2019 सीजनपासून तो केवळ 14 आयपीएल सामनेच खेळला आहे. ज्यात केवळ 5 विकेट्स घेऊ शकला आहे.

CSK vs KKR: पायातून रक्त वाहत असतानाही नाही सोडलं मैदान, ‘या’ खेळाडूचे फोटो पाहून चाहतेही भावूक

IPL 2021: केकेआरचं विजयाचं स्वप्न भंगलं, अखेरच्या चेंडूवर पराभव, रंगतदार सामन्यात चेन्नई विजयी

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

(KKR Spinner Kuldeep Yadav injured in uae return to india out for 6 months)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI