KKR vs RCB Live Score, IPL 2021 : वरुणच्या फिरकीची जादू आणि सलामीवीरांची कमाल, केकेआरचा 9 विकेट्सनी दमदार विजय

KKR vs RCB Live Score in Marathi : कर्णधार म्हणून अखेरची आयपीएल असणाऱ्या कोहलीचा उर्वरीत आयपीएलमधील आज पहिलाच सामना आहे. यावेळी केकेआरच्या आव्हानाला त्याला सामोरं जायचं आहे.

KKR vs RCB Live Score, IPL 2021 : वरुणच्या फिरकीची जादू आणि सलामीवीरांची कमाल, केकेआरचा 9 विकेट्सनी दमदार विजय
केकेआरचा संघ

IPL 2021 : युएईमध्ये सुरु झालेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात आज विराट कोहलीचा संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरु इयॉन मॉर्गन कर्णधार असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाशी भिडणार आहे. अबूधाबीच्या शेख जायद मैदानात हा सामना खेळवला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीने उत्तम प्रदर्शन करत गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले आहे. तर केकेआरचं प्रदर्शन अत्यंत खराब असून 7 पैकी 5 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे ते 7 व्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार आहेत. दरम्यान कोहलीने त्याच्या 200 व्या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. पण आरसीबीच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने अवघ्या 92 धावांवर सर्व संघ सर्वबाद झाला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने जादूई गोलंदाजी करत 3 विकेट आणि 1 रनआउट केला. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर वेकटेंश अय्यर (नाबाद 41) आणि शुभमन गिल (48) यांच्या जोरावर केकेआरने 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 20 Sep 2021 22:23 PM (IST)

  KKR vs RCB: केकेआर 9 विकेट्सनी विजयी

  आधी आरसीबीला 92 धावांत सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर वेकंटेश अय्यर (नाबाद 41) आणि शुभमन गिल (48) यांच्या जोरावर केकेआरने 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला.

 • 20 Sep 2021 22:20 PM (IST)

  KKR vs RCB: शुभमनचं अर्धशतक हुकलं

  img

  केकेआरचा सलामीवीर शुभमन गिल 48 धावांवर बाद झाला आहे. चहलच्या बोलिंगवर सिराजने त्याचा झेल घेतला आहे. बाद झाला असला तरी गिलने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे.

 • 20 Sep 2021 22:16 PM (IST)

  KKR vs RCB : 7 ओव्हरनंतर केकेआर विजयापासून केवळ 31 धावा दूर

  केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि वेकंटेश अय्यर यांनी धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या 7 ओव्हरमध्ये 62 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यांना विजयासाठी केवळ 31 धावांची गरज आहे.

 • 20 Sep 2021 21:27 PM (IST)

  KKR vs RCB : 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआर मैदानात

  आरसीबीला अवघ्या 92 धावांवर सर्वबाद केल्यानंतर केकेआरचा संघ 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आहे. सलामीला शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर हे दोघे आले आहेत.

 • 20 Sep 2021 21:14 PM (IST)

  KKR vs RCB : 92 धावांवर आरसीबी सर्वबाद

  img

  प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर आरसीबीच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने त्यांचा सर्व संघ 92 धावांवर सर्वबाद झाला आहे.

 • 20 Sep 2021 21:03 PM (IST)

  KKR vs RCB : हर्षल पटेल बाद, फर्ग्यूसनकडून त्रिफळाचीत

  img

  हर्षल पटेलच्या रुपात आरसीबीचा नववा गडीही बाद झाला आहे. लॉकी फर्ग्यूसनने त्याला त्रिफळाचीत केलं असून 83 धावांवर आरसीबीचे 9 गडी बाद झाले आहेत.

 • 20 Sep 2021 21:01 PM (IST)

  KKR vs RCB : कायल जेमिसनचं नशीब खराब, अजबरित्या झाला बाद

  img

  फिरकीने जादू करणाऱ्या वरुणने कायल जेमिसनला रनआऊट केलं आहे. नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या जेमिसन धाव घेण्यासाठी काहीसा पुढे जाताच चेंडू वरुणच्या हाताला लागून स्टंम्पला लागला ज्यामुळे जेमिसनला बाद करार देण्यात आलं.

 • 20 Sep 2021 20:49 PM (IST)

  KKR vs RCB : वरुणने आरसीबीला दिला तिसरा झटका

  img

  वरुणने 14 व्या ओव्हरमध्ये सचिन बेबीला बाद तरत आरसीबीच्या सातव्या गड्याला तंबूत धा़डलं आहे. नितीशने झेल पकडला असून अवघ्या 66 धावांवर आरसीबीचे सात गडी बाद झाले आहेत.

 • 20 Sep 2021 20:38 PM (IST)

  KKR vs RCB : वरुणला लागोपाठ दोन विकेट्स

  img

  मॅक्सवेलला बाद करताच वरुणने डेब्यू सामना खेळणाऱ्या हसरंगाला देखील पायचीत करत तंबूत धाडले आहे.

 • 20 Sep 2021 20:37 PM (IST)

  KKR vs RCB : मॅक्सवेल अडकला वरुणच्या जाळ्यात

  img

  केकेआरचा मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल अडकला आहे. त्यामुळे आरसबीचे 5 गडी तंबूत परतले आहेत.

 • 20 Sep 2021 20:21 PM (IST)

  KKR vs RCB : रस्सेलचा भेदक चेंडू, एबी डिव्हिलीयर्स बाद

  img

  आरसीबी संघाला 9 व्या ओव्हरमध्ये दोन झटके बसले असून आधी भरत बाद झाल्यानंतर फलंजदाजीला आलेल्या एबी डिव्हीलीयर्सला आंद्रे रस्सेलने शून्यावर पायचीत केले आहे.

 • 20 Sep 2021 20:14 PM (IST)

  KKR vs RCB : आरसीबीला तिसरा झटका

  img

  आरसीबीकडून आज सलामीचा सामना खेळणारा केएस भरत 16 धावा करुन बाद झाला आहे. आंद्रे रस्सेलच्या चेंडूवर शुभमन गिलने त्याचा झेल पकडला आहे.

 • 20 Sep 2021 20:05 PM (IST)

  KKR vs RCB : पडीक्कल आउट!

  img

  आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल उत्तम लयीत खेळताना दिसून येत होता. पण अचानक लॉकी फर्ग्यूसनच्या एका चेंडूवर शॉट खेळण्यास चुकल्याने पडीक्कल बाद झाला आहे.

 • 20 Sep 2021 19:57 PM (IST)

  KKR vs RCB : सुनिल नारायणच्या हातात चेंडू

  4 षटकानंतर 28 धावा आणि एक विकेट गमावल्यानंतर आता आरसीबीच्या फलंदाजाना बाद करण्यासाठी केकेआरचा स्टार खेळाडू सुनिल नारायण गोलंदाजीसाठी आला आहे.

 • 20 Sep 2021 19:41 PM (IST)

  KKR vs RCB : विराट कोहली बाद

  img

  दुसऱ्याच षटकात आरसीबी संघाला मोठा झटका बसला आहे. प्रसिध कृष्णाने कर्णधार विराटला पायचीत करत केकेआरला पहिलं यश मिळवून दिलं आहे. अवघ्या 5 धावा करुन कोहली बाद झाला आहे.

 • 20 Sep 2021 19:34 PM (IST)

  KKR vs RCB : देवदत्तसोबत कर्णधार कोहली सलामीला

  शक्यतो तिसऱ्या स्थानावर उतरणारा विराट कोहली आज केकेआर विरुद्दच्या सामन्यात सलामीला उतरला आहे. देवदत्त पडीक्कलसोबत तो सलामीला आला आहे.

 • 20 Sep 2021 19:14 PM (IST)

  KKR vs RCB : आरसीबीचे अंतिम 11

  विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, सचिन बेबी, वनिंजू हसरंगा, कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

 • 20 Sep 2021 19:12 PM (IST)

  KKR vs RCB : केकेआरचे अंतिम 11

  शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रस्सेल, सुनिल एन., लॉकी फर्ग्यूसन,  वरुण चक्रवर्थी, प्रसिध कृष्णा

 • 20 Sep 2021 19:05 PM (IST)

  KKR vs RCB : कोहलीने निवडली फलंदाजी

  सामन्यात नाणेफेक जिंकत विराटने फलंदाजी निवडली आहे. एक मोठा स्कोर उभा करुन केकेआरला नमवण्यासाठी विराटची टोळी सज्ज झाली आहे.

 • 20 Sep 2021 19:04 PM (IST)

  KKR vs RCB : आरसीबीचा संघ निळ्या जर्सीत

  कोरोनाच्या महामारीत सर्वांची सेवा करताना फ्रंटलाईन वर्कर्स घालत असलेल्या पीपीईकिटच्या निळ्या रंगाची जर्सी घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कोहलीची टोळी आज निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे.

 • 20 Sep 2021 19:02 PM (IST)

  KKR vs RCB : विराट द्विशतकासाठी सज्ज

  आरसीबीचा कर्णधार विराट आज आरसीबीकडूनता त्याचा 200 वा आयपीएल सामना खेळणार आहे. कालच त्याने यंदाच्या पर्वानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी या पर्वात तो जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करणार हे नक्की!

 • 20 Sep 2021 19:01 PM (IST)

  अबू धाबीमधील खेळपट्टी आणि हवामान अहवाल

  इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू निक नाईट यांच्या मते अबू धाबीतील हवामान खूप गरम आहे. दोन्ही संघ मैदानात उतरल्यानंतर वातावरण अधिक तापेल. मॅथ्यू हेडनच्या मते, खेळपट्टीवर गवत आहे. टेनिस बॉलप्रमाणे बाउन्स मिळण्याची अपेक्षा आहे. हेडनच्या मते स्पिनर्सना मधल्या षटकांमध्येही फायदा मिळू शकतो.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI