MI vs KKR Live Score, IPL 2021 : केकेआरचा दमदार विजय, मुंबईला 7 गडी राखून चारली धुळ

MI vs KKR Live Score in Marathi: दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजयाने करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आज तगड्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. तर पहिल्या सामन्यात चेन्नईने मात दिलेल्या मुंबईला आज विजयाची अपेक्षा आहे.

MI vs KKR Live Score, IPL 2021 : केकेआरचा दमदार विजय, मुंबईला 7 गडी राखून चारली धुळ
व्यंकटेश अय्यर

MI vs KKR: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धोनीच्या चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या मॅचमध्ये कर्णधार कायरन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही. आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे. मुंबईला जर टॉप 4 मध्ये टिकून राहायचं असेल तर आज होणाऱ्या सामन्यात केकेआरचा पराभव करणं फार महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर मुंबईकडून सलामीवीर रोहित आणि डिकॉकने उत्तम सुरुवात केली. पण रोहित बाद होताच नंतरच्या फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. केवळ डिकॉकने अर्धशतक झळकावल्यामुळे मुंबई 155 धावांपर्यंत मजल मारु शकली. ज्यामुळे 156 धावा करुन जिंकण्यासाठी केकेआर मैदानात उतरली. ज्यानंतर युवा फलंदाज अय्यर आणि त्रिपाठी यांनी अर्धशतकं ठोकत संघाला एक सोपा पण मोठा असा 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 23 Sep 2021 22:54 PM (IST)

  MI vs KKR: कर्णधार मॉर्गन बाद

  img

  विजयासाठी काही धावा शिल्लक असताना केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन झेलबाद झाला आहे. बुमराहच्या चेंडूवर बोल्टने त्याचा झेल टीपला.

 • 23 Sep 2021 22:42 PM (IST)

  MI vs KKR: व्यंकटेश अय्यर बाद

  img

  दमदार खेळी केल्यानंतर अखेर व्यंकटेश अय्यर बाद झाला आहे. 53 धावांवर बुमरहाने त्याला त्रिफळाचित केलं आहे.

 • 23 Sep 2021 22:38 PM (IST)

  MI vs KKR: अय्यरपाठोपाठ त्रिपाठीचंही अर्धशतक

  अय्यर पाठोपाठ राहुल त्रिपाठीनेही अप्रतिम अर्धशतक ठोकलं आहे. त्यानेही अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक लगावलं आहे.

 • 23 Sep 2021 22:33 PM (IST)

  MI vs KKR: अय्यरचं धाकड अर्धशतक

  केकेआरचा युवा खेळाडू व्य़ंकटेश अय्यरने धाकड फलंदाजी करत अवघ्या 25 धावांत 50 धावा ठोकत अर्धशतक ठोकलं आहे.

 • 23 Sep 2021 22:30 PM (IST)

  MI vs KKR: केकेआरच्या 100 धावा पूर्ण

  केकेआर संघाच्या युवांनी अप्रतिम फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. गिलने उत्तम सुरुवात करताच पुढे अय्यर आणि त्रिपाठी तुफान फलंदाजी करत आहे. 10 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 111 झाला आहे.

 • 23 Sep 2021 21:56 PM (IST)

  MI vs KKR: सलामीवीर गिल बाद

  img

  धडाकेबाज खेळीने सुरुवात केेलेल्या केकेआरला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर गिल बाद झाला असून बुमरहाने त्याला बाद केलं आहे.

 • 23 Sep 2021 21:54 PM (IST)

  MI vs KKR: केकेआर संघाची उत्तम सुरुवात

  केकेआरने 156 धावांच्या लक्ष्याच्या दिशेने आक्रमक सुरुवात केली आहे. सलामीवीर गिल आणि अय्यर अप्रतिम फलंदाजी करत आहेत.

 • 23 Sep 2021 21:28 PM (IST)

  MI vs KKR: 155 धावांवर मुंबईचा डाव आटोपला

  उत्तम सुरुवात केलेल्या मुंबई इंडियन्सने क्विंटन डिकॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर 155 धावापर्यंत मजल मारली आहे. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 156 धावांचे आव्हान आहे.

 • 23 Sep 2021 21:23 PM (IST)

  MI vs KKR: मुंबईचे लागोपाठ दोन गडी बाद

  img

  पोलार्ड धावचीत झाल्यावर पुढच्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरने कृणालचा झेल घेत त्याला तंबूत परतवलं आहे.

 • 23 Sep 2021 21:21 PM (IST)

  MI vs KKR: पोलार्ड धावचीत

  img

  अखेरचं षटक सुरु असून धावा गोळा करण्याच्या नादात कायरन पोलार्ड धावचीत झाला आहे. कर्णधार मॉर्गनच्या मदतीने लॉकीने त्याला बाद केलं.

 • 23 Sep 2021 21:03 PM (IST)

  MI vs KKR: इशान किशन झेलबाद

  img

  युवा खेळाडू इशान किशन लॉकी फर्ग्यूसनच्या चेंडूवर आंद्रे रस्सेलच्या हाती झेलबाद झाला आहे.

 • 23 Sep 2021 20:53 PM (IST)

  MI vs KKR: प्रसिधने घेतली क्विंटन डिकॉकची विकेट

  img

  प्रसिध कृष्णाने सूर्यकुमारनंतर सेट फलंदाज क्विंटन डिकॉकलाही बाद केलं आहे. सुनील नारायणने डिकॉकचा झेल घेतला आहे.

 • 23 Sep 2021 20:42 PM (IST)

  MI vs KKR: क्विंटन डिकॉकचं अर्धशतक

  मुंबईचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. सध्या तो 50 धावांवर खेळत आहे.

 • 23 Sep 2021 20:35 PM (IST)

  MI vs KKR: सूर्यकुमार 5 धावा करुन बाद

  img

  रोहित शर्मा बाद झाल्यानंतर काही वेळातच केवळ 5 धावा करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे.

 • 23 Sep 2021 20:19 PM (IST)

  MI vs KKR: मुंबईला पहिला झटका

  img

  मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला आहे. दिग्गज फिरकीपटू सुनील नाराय़णने नवव्यांदा शर्माला जाळ्यात फसवलं आहे. शुभमनने सीमारेषेवर रोहितची कॅच घेतली.

 • 23 Sep 2021 19:59 PM (IST)

  MI vs KKR: डिकॉकचे एका षटकात 3 षटकार

  img

  मुंबईने उत्तम सुरुवात केली असून शर्मासह डिकॉकने सहाव्या षटकात 3 षटकार छोकले आहेत.

 • 23 Sep 2021 19:46 PM (IST)

  MI vs KKR: रोहितचे लागोपाठ दोन चौकार

  img

  चौथ्या षटकात वरुण चक्रवरर्तीला रोहित शर्माने लागोपाठ दोन चौकार मारले आहेत.

 • 23 Sep 2021 19:30 PM (IST)

  MI vs KKR: कर्णधार रोहित डिकॉकसोबत फलंदाजीसाठी मैदानात

  मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फिट झाल्यामुळे तो क्विंंटन डीकॉकसोबत सलामीला मैदानात आला आहे.

 • 23 Sep 2021 19:14 PM (IST)

  मुंबई इंडियन्स अंतिम 11

  रोहित शर्मा (कर्मधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

 • 23 Sep 2021 19:10 PM (IST)

  कोलकाता नाईट रायडर्स अंतिम 11

  इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

 • 23 Sep 2021 19:05 PM (IST)

  नाणेफेक जिंकत केकेआरने निवडली गोलंदाजी

  नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा इयॉन मॉर्गनने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

 • 23 Sep 2021 19:05 PM (IST)

  रोहित शर्मा संघात दाखल

  मुंबई इंडियन्स संघाच्या फॅन्ससाठी एक आनंदाची गोष्ट आहे. रोहित शर्मा फिट होऊन मैदानात उतरला आहे.

 • 23 Sep 2021 19:05 PM (IST)

  आतापर्यंत MI vs KKR

  आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि केकेआर 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईचा पगडा कमालीचा भारी असून त्यांनी 28 पैकी 22 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केकेआर केवळ 6 वेळाच विजय मिळवू शकली आहे. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध तीनदा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये दोन वेळा मुंबईचाच संघ जिंकला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI