AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाही मुंबईची पहिली मॅच देवाला, सलग 9 वर्ष सलामीला हरले

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे.

यंदाही मुंबईची पहिली मॅच देवाला, सलग 9 वर्ष सलामीला हरले
Mumbai Indians vs Royal Challengers Banglore
| Updated on: Apr 10, 2021 | 12:03 AM
Share

चेन्नई : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (MI vs RCB : Mumbai Indians lost opening match of IPL for 9 consecutive years)

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली आहे. 2013 पासून आतापर्यंत दरवर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. ही पराभवाची मालिका यंदा खंडित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु मुंबईतला ही पराभवाची मालिका थांबवता आलेली नाही. सलग 9 वर्ष मुंबई सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. या 9 वर्षात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, परंतु सलामीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.

रोहितच्या फेव्हरेट स्टेडियमवर मुंबईचा पराभव

चेन्नईचं MA Chidambram Stadium हे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी नेहमीच लकी ठरलं आहे. या मैदानात आंतरराष्ट्रीय सामने खेळताना रोहितने धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच आयपीएलमध्येदेखील रोहितसाठी है मैदान लकी ठरलंय. वास्तविक हे मैदान महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचं होम ग्राऊंट आहे. परंतु या मैदानात रोहितने मुंबईचं नेतृत्व करत धोनीच्या चेन्नईला तीन वेळा धूळ चारली आहे. परंतु रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा संघ या मैदानात कधीच हरलेला नाही. परंतु रोहितचा विजयरथ आजच्या सामन्याद्वारे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने रोखला आहे.

विराटचं पहिलं यश

MA Chidambram Stadium वर विराट कोहली बंगळुरुचा कर्णधार म्हणून याआधी यशस्वी ठरला नव्हता. धोनीच्या चेन्नईकडून या मैदानात विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला कधीही विजय मिळवता आला नव्हता. परंतु आज मुंबई इंडियन्सचा पराभव करत विराट कोहलीने Chidambram Stadium वर विजयी सलामी दिली आहे.

हर्षल पटेल ठरला हिरो

आजच्या सामन्याच हिरो ठरला तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल. आजच्या सामन्यात बंगळुरुकडून गोलंदाजी करताना हर्षलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

हर्षलकडून मुंबईचा ‘पंच’नामा

आजच्या सामन्यात सुरुवातीला मुंबईच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता. परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याला पायचित (LBW) पकडत पहिलं यश मिळवलं. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने इशान किशनला बाद करत दुसरं यश मिळवलं. वैयक्तिक चौथ्या आणि सामन्यातील 20 व्या षटकात हर्षलने तीन विकेट्स घेतल्या. परंतु त्याला हॅटट्रिक साधता आली आहे. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने कृणाल पंड्याला डॅन ख्रिश्चनकरवी झेलबाद केलं, त्या पुढच्याच चेंडूवर त्याने कायरन पोलार्डला वॉशिंग्टन सुंदरकडे झेल ध्यायला भाग पाडलं. पुढच्या चेंडूवर त्याला हॅट्ट्रिकची संधी होती खरी, परंतु Marco Jansen ने हा चेंडू खेळून काढला. परंतु त्या पुढच्या चेंडूवर हर्षलने Jansen ला त्रिफळाचित केलं. अशा पद्धीने पटेलने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेत यंदाच्या हंगामाचा श्रीगणेशा केला आहे.

संबंधित बातम्या 

Harshal Patel RCB : मुंबईच्या तोफांमध्ये पाणी भरलं, पंड्या बंधू, पोलार्डला नाचवलं, कोण आहे हर्षल पटेल?

Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून, 6 शहरांत आयोजन, 11 डबल हेडर मॅच आणि बरंच काही…!

(MI vs RCB : Mumbai Indians lost opening match of IPL for 9 consecutive years)

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.