AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी मोहम्मद सिराजने आताच बिगुल फुंकलं,म्हणाला…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील महत्त्वाचा टप्पा आहे. ही मालिका पुढच्या प्रवासासाठी खूपच महत्त्वाची आहे. असं असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आताच बिगुल फुंकलं आहे.

IND vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी मोहम्मद सिराजने आताच बिगुल फुंकलं,म्हणाला...
IND vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी मोहम्मद सिराजने आताच बिगुल फुंकलं,म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Nov 11, 2025 | 6:16 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी कसोटी मालिका सुरु आहे. पर्वात भारताचा तिसरी कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ही मालिका काहीही करून जिंकणं भाग आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली तर गुणतालिकेत दुसरं स्थान गाठणार आहे. सध्या भारतीय संघ हा तिसऱ्या स्थानावर आहे. भारत दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना 14 नोव्हेबंरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ कोलकात्यात पोहोचले असून कसून सराव सुरु आहे. या मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपलं मत व्यक्त केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी ही मालिका किती महत्त्वाची आहे याबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं.

मोहम्मद सिराजसाठी सध्याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पर्व चांगलं गेलं आहे. आतापर्यंत दोन कसोटी मालिकेत त्याने एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज स्टार स्पोर्ट्सशी चर्चा करताना म्हणाला की, ‘ही मालिका नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पर्वासाठी महत्त्वाची हे. खासकरून यासाठी की दक्षिण अफ्रिकेने जेतेपद मिळवलं आहे. भले त्यांनी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. पण आम्ही चांगली कामगिरी करण्यास तयार आहोत. आम्ही एक सकारात्मक वातावरण तयार केलं आहे. इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकलो.’

मोहम्मद सिराजने पुढे सांगितलं की, ‘वैयक्तिकरित्य मी चांगल्या लयीत गोलंदाजी करत आहे आणि याचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे. मजबूत संघांचा सामना केल्याने सुधारणा करण्यासाठी क्षेत्रे ओळखण्यास मदत होते आणि मी या आव्हानासाठी खरोखर उत्साहित आहे.’ दक्षिण अफ्रिकन संघात भारतात खेळत असल्याने टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. पण न्यूझीलंडविरुद्धचा मागचा अनुभव पाहता क्रीडाप्रेमींच्या मनात धाकधूक आहेच. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यात दक्षिण अफ्रिकेने जेतेपद मिळवल्याने भारताला सहज विजय मिळवून देणार नाही यातही काही दुमत नाही.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.