कॅप्टन कूल धोनी दुसऱ्यांदा बाबा बनणार?, साक्षीला पाहून ट्विटरवर चर्चांना उधाण

धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने नुकतच आयपीएल 2021 चं जेतेपद पटकावलं. यावेळी मैदानात त्याची पत्नी साक्षी, मुलगी जीवा सारेच उपस्थित होते.

कॅप्टन कूल धोनी दुसऱ्यांदा बाबा बनणार?, साक्षीला पाहून ट्विटरवर चर्चांना उधाण
विजयानंतर आनंद साजरा करताना धोनी परिवार

IPL 2021 Final: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मात देत एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने (CSK) जेतेपदावर नाव कोरलं. चौथ्यांदा ट्रॉफी खिशात घालणाऱ्या धोनीच्या (MS Dhoni) विजयासह आणखी एका चर्चेने ट्विटरवर खळबळ उडवली आहे. ती म्हणजे धोनीची पत्नी साक्षी प्रेग्नेंट असून धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची चर्चेने ट्विटरवर जोर धरला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी याने 4 जुलै, 2010 रोजी साक्षीसोबत (Sakshi Dhoni) लग्न केलं. त्यानंतर 6 फेब्रुवारी, 2015 रोजी त्यांच्या घरी कन्यारत्न आलं. जीवा असं तिचं नाव असून आता पुन्हा 2022 मध्ये म्हणजे पुढच्याच वर्षी धोनीला दुसरं मुल होणार असल्याची चर्चा (Sakshi Dhoni Pregnancy Rumours) ट्विटरवर उठली आहे. साक्षी 4 महिन्याची गर्भवती असून धोनीचा खास मित्र सुरेश रैनाची पत्नी प्रियांका रैनाने याबाबतची माहिती दिल्याचेही काही ट्विट नेटकरी करत आहेत. पण मुळात धोनी किंवा रैना परिवारातील कोणीच याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण साक्षी ही ज्याप्रकारचे कपडे घालून सामने पाहण्यासाठी येत आहे, तसे कपडे सेलेब्रेटीज शक्यतो प्रेग्नंसी दरम्यान घालत असल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. याच काही व्हायरल ट्विट्सपैकी काही ट्विटस् पाहूया…

असा मिळवला चेन्नईने विजय

आधी फलंदाजी करत चेन्नईने फाफच्या 86 धावांच्या जोरावर केकेआरसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. सीएसकेने ठेवलेल्या 193 धावांचा पाठलाग केकआरने अतिशय वेगात सुरु केला. दोन्ही सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी अप्रतिम फलंदाजी केली. 10 षटकापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. अय्यरने तर अर्धशतकही झळकावलं होतं. पण 11 व्या षटकात शार्दूने सेट फलंदाज अय्यरला (50) बाद करत पहिला झटका दिला. त्याच षटकात राणाही शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर पाहता पाहता संघाचे फलंदाज बाद होत गेले.

शुभमन गिलचं (51) अर्धशतक पूर्ण झालं खरं पण तोही लगेचच बाद झाला. अखेरच्या काही षटकात मावी (20) आणि फर्ग्यूसन (18) यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. पण तोवर फाळ वेळ झाली होती. ज्यामुळे अखेर चेंडू शिल्क न राहिल्याने केकेआर 27 धावांनी पराभूत झाली. चेन्नईकडून शार्दूलने 3, जाडेजा आणि हेजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर दीपक आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’

(MS Dhoni and sakshi dhoni to became parents again twitter abuzz with sakshi dhonis prgnancy)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI