AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच नो हँडशेक! भारत पाकिस्तान वादावर दिग्गजाने केला खुलासा, बंद दरवाजा आड काय घडतं?

IND vs PAK: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 61 धावांनी लोळवलं. दुसरीकडे, नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. आता या वादावर दिग्गज क्रिकेटपटूने मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला आहे.

खरंच नो हँडशेक! भारत पाकिस्तान वादावर दिग्गजाने केला खुलासा, बंद दरवाजा आड काय घडतं?
खरंच नो हँडशेक! भारत पाकिस्तान वादावर दिग्गजाने केला खुलासा, बंद दरवाजा आड काय घडतं?Image Credit source: PTI
| Updated on: Feb 20, 2026 | 3:42 PM
Share

IND vs PAK, No Handshake Policy: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय तर क्रिकेटच्या मैदानातही याचे पडसाद उमटले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करत नाही. आशिया कप स्पर्धेपासून असंच चित्र आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत जेव्हा भारत पाकिस्तान आमनेसामने आले, तेव्हाही नो हँडशेक पॉलिसी कायम असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पाठ फिरवली. तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाही तसाच निघून गेला. असं असताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकने भारत पाकिस्तान दरम्यान नो हँडशेक पॉलिसीबाबत एक मोठं विधान केलं आहे. एलिस्टर कुकच्या मते मैदानात हात मिळवणी न करणे ही एक दिखावा आहे. कारण खेळाडू बंद दरवाजा आड चर्चा करतात.

एलिस्टर कुकने ‘स्टिक टू क्रिकेट‘ या पॉडकास्टमध्ये मायकल वॉन, डेविड लॉयड आणि फिल टफनेल यांच्याशी चर्चा करताना हा दावा केला. एलिस्टर कुकने सांगितलं की, ‘खेळाडू बंद दरवाजा आड चर्चा करत नाही का? बोलत नाहीत का? मी कुठे तरी वाचलं होतं की, प्रत्येक जण बोलत आहे. असं वाटते की हा फक्त दिखावा आहे. नाही का? खरं सांगायचं तर ते फक्ट मैदानात हात मिळवणी करत नाहीत. पण बंद दरवाजा आड सर्व काही करत आहेत आणि सर्व काही ठीक आहे. ‘ दरम्यान, हातमिळवणी करत नसल्याने मायकल वॉनने नाराजी व्यक्त करत सांगितलं की, क्रिकेट मैदानात हात मिळवणी न करणं दुखद आहे.

एलिस्टर कुकच्या मते, खरं तर खेळाडूंमध्ये काहीच वैर नाही. त्याचं हे विधान भारत पाकिस्तान सामन्यानंतर चर्चेत आलं आहे. भारत पाकिस्तान यांच्यात सुपर 8 फेरीत तर सामना होणार नाही. त्यामुळे हातमिळवणी तसा काहीच प्रश्न नाही. पण दोन्ही संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत भिडू शकतात. जर तसं समीकरण जुळून आलं तर.. पण तेव्हाही नो हँडशेक पॉलिसी कायम असेल का? हा देखील प्रश्न आहे. कारण भारताने आशिया कप स्पर्धेत हा पवित्रा कायम ठेवला होता. त्यानंतर महिला क्रिकेटमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. अंडर क्रिकेटमध्येही हाच कित्ता गिरवला गेला.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....