AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Orange cap in IPL 2026: वैभव, अभिषेक, विराट सर्वांनाच दे धक्का…433 धावांच्या विस्फोटक खेळीचा बडा दावेदार

IPL 2026 Orange Cap Holder: ऑरेंज कॅपसाठीची लढाई रोमांचक वळणावर पोहचली आहे. या सामन्यातील समीकरणं जशी बदलली, तसे दावेदारही बदलत आहेत. स्पर्धेत नसलेला एक चेहरा नारंगी टोपीच्या स्पर्धेत समोर आला आहे. कोण आहे तो चेहरा? कसा ठरला तो गेमचेंजर?

Orange cap in IPL 2026: वैभव, अभिषेक, विराट सर्वांनाच दे धक्का...433 धावांच्या विस्फोटक खेळीचा बडा दावेदार
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, विराट कोहलीImage Credit source: फाईल फोटो
| Updated on: May 02, 2026 | 2:11 PM
Share

IPL 2026 Orange Cap Holder: आयपीएल 2026 मध्ये 43 सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यादरम्यान नारंगी रंगाच्या टोपीसाठी मोठा उलटफेर दिसला. एका स्टार फलंदाज कानामागून येऊन तिखट झाला आहे. हा तडफदार फलंदाज अचानक क्रमांक 1 वर आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल याने हा करिष्मा केला आहे. त्याने 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरोधात 75 धावांची खेळी करून विजयाला गवसणी घातली. त्यासोबतच त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला.

केएल राहुलच्या 433 धावा

उजव्या हाताने खेळणारा सलामीवीर केएल राहुल या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 433 धावा केल्या आहेत. राहुल याचा या हंगामात सरासरी 54.12 आणि स्ट्राइक रेट 185.84 इतका राहिला आहे. त्याने या आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 चौकार आणि 24 षटकार ठोकले आहेत. राहुल या हंगामात आतापर्यंत चार वेळा अर्धशतकाहून अधिकची खेळी खेळला आहे. यामध्ये त्याची पंजाबविरोधातील नाबाद 152 धावांचा सुद्धा समावेश आहे. केएल राहुल याने ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, हेनरिक क्लासेन या दमदार फलंदाजांना मागे टाकले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय

या हंगामाच्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्स संघाला 7 गड्यांनी पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत 225 धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुल (75) आणि निसंका (62) या दोघांच्या दमदार खेळीवर हा विजय 5 चेंडू शिल्लक असतानाच मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही दिल्लीने केला. हा विजय खेचून आणत दिल्लीने आता मैदान दूर नाही असे दाखवून दिले. दिल्ली संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स विजयासाठी झुंजत आहे, पण लवकरच संघ गुणतालिकेत मोठी बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्ली कॅपिटल्स चमकत्कार दाखवणार?

IPL 2026 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सची (DC) टीम आतापर्यंत 9 सामन्यात 4 वेळा जिंकली आहे. तर 5 वेळा हारली आहे. दिल्लीचा संघ 8 अंकसह या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रनरेट -0.895 इतका आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार का असा सवाल विचारल्या जात आहे.

Follow Us
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली