AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शाहीन आफ्रिदीने विकेट घेताच केलेल्या अ‍ॅक्शनची रंगली चर्चा, पाहा काय केलं ते

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विकेट घेताच अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. त्यामुळे त्याच्या अ‍ॅक्शनची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याने नेमकं काय केलं ते जाणून घ्या

Video : शाहीन आफ्रिदीने विकेट घेताच केलेल्या अ‍ॅक्शनची रंगली चर्चा, पाहा काय केलं ते
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 24, 2024 | 8:07 PM
Share

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानची हवा काढली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 448 धावा केल्या आणि डाव घोषित केला. बांगलादेशला या धावा गाठणं कठीण होईल असं वाटत होतं. पण भलतंच घडलं. बांगलादेशने पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं. बांगलादेशकडून मधल्या फळीत मुशफिकुर रहिमने 341 चेंडूचा सामना 191 धावा केल्या. त्याचं द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. तर लिटन दासने 56 आणि मेहिदी हसन मिराज याने 77 धावांची खेळी केली. तर शदमानने 93 धावांची खेळी करून बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या डावात 565 धावा करत 127 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना पाकिस्तानने दिवसअखेर 1 गडी गमवून 23 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने 30 षटकं टाकली आणि 88 धावा देत 2 गडी बाद केले. असं सर्व सामन्याचं स्वरूप असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची अ‍ॅक्शन चर्चेत आहे. शाहीनने बांगलादेशच्या हसन मेहमूदला बाद केलं आणि हातात बाळ असल्याची अ‍ॅक्शन केली. बाळाला हातात घेऊ झोका घेत असल्याचं दाखवून दिलं.

शाहीन आफ्रिदी आता वडिलांच्या भूमिकेत आला आहे. त्याच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. शाहीन आणि अंशा यांनी आपल्या बाळाचं नाव अली यार असं ठेवलं आहे . शाहीन सध्या कसोटी सामना खेळत असून रविवारी शेवटचा दिवस आहे. या दिवसाचा खेळ संपला की शाहीन अफ्रिदी कुटुंबियांना भेटण्यासाठी कराचीत जाणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्टपासून दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी हजेरी लावेल. शाहीन आणि अंशा यांचा निकाह फेब्रुवारी 2023 मध्ये कराचीत झाला होता. या निकाह सोहळ्यात जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये लग्नाचं रिसेप्शन आयोजित केलं होतं. यात दिग्गजांनी हजेरी लावली होती.

शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी आतापर्यंत 30 कसोटी, 53 वनडे आणि 70 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत त्याने 110 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 104, तर टी20 96 विकेट आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन आफ्रिदीवर टी20 क्रिकेट संघाची धुरा सोपवली होती. पण संघाची निराशाजनक कामगिरी पाहता त्याला दूर करण्यात आलं. शाहीन फक्त एका मालिकेतच संघाचा कर्णधार होता.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.