AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात साप निघला तर सावधान, असतात हे तीन मोठे संकेत, आयुष्यच बदलू जातं

उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हामुळे जमीन तापत असल्यामुळे साप थंड जागेचा शोध घेताना तुमच्या घरात देखील घुसू शकतात. जर तुम्हाला तुमच्या घरात साप दिसला तर तसं पाहाता ही एक सामान्य घटना आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार साप घरात दिसला तर त्याचे तीन मोठे संकेत असतात.

Vastu Shastra : घरात साप निघला तर सावधान, असतात हे तीन मोठे संकेत, आयुष्यच बदलू जातं
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 8:29 PM
Share

उन्हाळा सुरू झाला आहे, यंदा तर प्रचंड उष्णता जाणवत आहे. राज्यातील अनेक भागामध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे गेले आहे. उन्हामुळे जमीन तापते, जमीन गरम झाल्यानं साप बिळातून बाहेर पडतात आणि थंड जागेचा शोध घेतात, अशावेळी थंड जागेचा शोध घेत असताना साप तुमच्या घरात देखील शिरण्याची शक्यता असते. साप घरात येणं ही एक नैसर्गिक घटना आहे. परंतु वास्तुशास्त्रात साप घरात येणं ही नैसर्गिक घटना माण्यात येत नाही. जर तुमच्या घरात वारंवार साप निघत असतील तर ही घटना तुमच्या घरात असलेला वास्तुदोष दर्शवते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात साप निघणं हे तुमच्या घरावर असलेला राहु आणि केतुचा प्रभाव दर्शवते. जर तुमच्या घरात राहुदोष असेल तर साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतात, असा दावाही वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे. विशेष: जर तुमच्या घराची नैऋत्य दिशा अस्वच्छ असेल, तर अशा घटना घडण्याची शक्यता असते, घरात राहुदोष निर्माण होतो.

घरात या दिशेला साप निघाल्यास असते धोक्याची घंटी

जर तुमच्या घरामध्ये वांरवार उत्तर -पश्चिम दिशेला अर्थात वायव्य दिशेला किंवा दक्षिण -पश्चिम दिशेला साप निघत असेल तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं. यामुळे घरात काहीही कारण नसताना वादविवाद होतात. घर आर्थिकदृष्या अस्थिर बनतं. कुटुंबप्रमुख मानसिक दृष्ट्‍या अस्थिर होतो. तसेच हातात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला फट असणं किंवा उंबरा तुटलेला असणं हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि ही नकरात्मक ऊर्जा सापांना घरात येण्याचं आमंत्रण देते असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे, त्यामुळे कधीही आपल्या घराचा उंबरा हा तुटलेला असू नये.

पितृदोष – जर तुमच्या घरात साप वारंवार येत असतील तर त्याचा संबंध पितृदोषाशी देखील असतो. जेव्हा तुमच्या घरात पितृदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला अनेकदा घरामध्ये सापांचं दर्शन होतं. तुमच्या घरात पितृदोष निर्माण झाला आहे, याचा तो एक संकेत असतो, त्यामुळे जर तुमच्या घरात वारंवार साप निघत असतील तर या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.