WI vs PAK : जगासमोर लाज गेल्यानंतर Pcb चं डोकं ठिकाणावर, विंडीज विरुद्धच्या वनडे-टी 20I सीरिजसाठी टीम जाहीर
Pakistan Tour Of West Indies 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विंडीजला वनडेऐवजी जास्तीत जास्त सामने खेळवण्याबाबत म्हटलं होतं. मात्र विंडीजने पीसीबीची लाज काढत कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. तसंच खेळायचं की नाही, हे तुम्हाला ठरवाचं आहे, असंही विंडीज क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं होतं.

बांगलादेश क्रिकेट टीमने श्रीलंकेवर श्रीलंकेत टी 20i मालिकेत 2-1 ने मात केली. त्यानंतर बांगलादेशने मायदेशात पाकिस्तानचा टी 20i मालिकेत 2-1 अशा फरकाने धुव्वा उडवला. पाकिस्तानने तिसर्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत लाज राखली. त्यानंतर आता पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान विंडीज विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांचीच एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विंडीजला एकदिवसीऐवजी जास्तीत जास्त टी 20i सामने खेळवण्यात यावे, असं म्हटलं होतं. मात्र विंडीज क्रिकेट बोर्डाने सर्वकाही नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगत भूमिका स्पष्ट केली होती.
तसेच खेळायचं की नाही? हे पाकिस्तानने ठरवावं, असं म्हणत विंडीज क्रिकेट बोर्डाने पीसीबीला त्यांची लायकी दाखवून दिली. त्यानंतर आता पाकिस्तान बॅकफुटवर आली. पाकिस्तानने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानने 2 मालिकांसाठी 2 कर्णधारांची नियुक्ती केली आहे. सलमान अली आगाह टी 20i संघाचं नेतृत्व करणार आहे. तर एकदिवसीय संघात मोहम्मद रिझवान याचं कमबॅक झालं आहे. रिझवान एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच संघात बाबर आझम आणि शाहिन आफ्रिकी या दोघांचं कमबॅक झालं आहे.
अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन
पाकिस्तान संघात बाबर आझम याचं कमबॅक झालं आहे. बाबरने अखेरचा सामना हा 5 एप्रिलला न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर बाबरला विश्रांती देण्यात आली होती. तसेच शाहीन शाह आफ्रिदी याने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा मार्च 2025 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. तसेच मोहम्मद रिझवान यालाही विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता रिझवानचं वनडे सीरिजमधून कमबॅक झालं आहे.
पाकिस्तान बॅकफुटवर
Star power returns for Pakistan’s white-ball tour of the Caribbean 💪
Squad details 👇 https://t.co/xP8YTdbah6
— ICC (@ICC) July 25, 2025
पाकिस्तानचा विंडीज दौरा
विंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे.
टी 20I मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कॅप्टन), अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), सईम अयूब, शाहीन शाह अफ्रीदी आणि सुफयान मोकिम.
वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, सईम अयूब, शाहीन शाह अफ्रीदी आणि सुफयान मोकिम.
