Video : पंचाने बाद करुनही खेळपट्टीवर उभा होता, रिंकू सिंगनं नेमकं काय केलं, पाहा Highlights Video

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय.

Video : पंचाने बाद करुनही खेळपट्टीवर उभा होता, रिंकू सिंगनं नेमकं काय केलं, पाहा Highlights Video
रिंकू सिंगImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 10:18 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH) सामना सुरु आहे. कोलकाताने टॉस जिंकला असून हैदराबाद पहिले गोलंदाजी केलीय. 61 वा सामना आज खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. तो 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. दरम्यान, हैदराबादने उम्रान मलिकच्या दोन षटकांत सामना फिरवला आणि कोलकाता बॅकफूटवर फेकला गेला. अय्यर आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नितिश राणा यांनी केकेआरचा डाव सावरलाय. मलिकने एकाच षटकात या दोघांनाही परत पाठवले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर टी नटराजनने केकेआरच्या रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू केलं. पंचाने त्यानंतर त्याला बाद केलं. पण तरिही रिंकू हा खेळपट्टीवर उभा राहिल. यानंतर गोंधळ उडाला होता.

मैदानात नेमकं काय झालं?

व्यंकटेश अय्यर बाद

व्यंकटेश अय्यर दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को यानसेनने त्याला त्रिफळाचीत केले. व्यंकटेशने बाद होण्यापूर्वी सहा चेंडूंत सात धावा केल्या.

नितीश राणा बाद

नितीश राणा चांगली फलंदाजी करूनही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर तो उमरान मलिकने शशांक सिंगच्या हाती झेलबाद झाला. राणाने बाद होण्यापूर्वी 16 चेंडूत 26 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे बाद

उमरान मलिकने आपल्या पहिल्याच षटकात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून शानदार सुरुवात केली आहे. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमरानने अजिंक्य रहाणेला शशांककडून झेलबाद केले. उमरानच्या झेललेल्या चेंडूवर रहाणेने स्वीपर कव्हरच्या दिशेने हवेत शॉट खेळला पण शशांकने सीमारेषेजवळ धावताना सर्वोत्तम झेल टिपला.

कर्णधार श्रेयस बाद

उमरान मलिकने केकेआरला बॅकफूटवर ढकलले. त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात तिसरा यश मिळवले आहे. यावेळी उमरानने कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीकडून झेलबाद केलं. श्रेयसने बाद होण्यापूर्वी नऊ चेंडूत पंधरा धावा केल्या.

पाचवा झटका

पहिल्याच षटकात महागड्या ठरलेल्या नटराजनने दुसऱ्या षटकात शानदार पुनरागमन करत सात धावांत मोठी विकेट घेतली. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. रिंकूने बाद होण्यापूर्वी सहा चेंडूंत पाच धावा केल्या.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.