PBKS vs MI IPL 2023 Score : मुंबई इंडिअन्स संघाने बदला घेतलाच, पंजाबवर 6 विकेट्सने विजय
Punjab Kings vs Mumbai Indians IPL 2023 Score in Marathi : मुंबई इंडियन्सकडून आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात यशस्वी पाठलाग आहे. यासोबतच हा या मोसमातील सर्वात यशस्वी पाठलागही आहे.

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी कमाल करत पंजाबला त्यांच्याच घरात हरवलं. पंजाबने मुंबईसमोर 215 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य खूप अवघड वाटलं होतं, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी झंझावाती खेळी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. शेवटी तिलक वर्माने सिक्सर मारत विजय साकार केला. ईशानने 41 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. तर सूर्यकुमारने 31 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. तिलकनेही 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पॉइंट टेबल मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा आज पराभव झाल्यामुळे 10 गुणांसह पॉईंट टेबल मध्ये सातव्या स्थानी आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या संघाचे 10 गुण झालेले आहेत.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान
LIVE Cricket Score & Updates
-
PBKS vs MI : मुंबई विजयी
मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी करत 18.5 षटकात 215 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यासह पंजाबचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह मुंबईने पंजाबकडून पराभवाचा बदला घेत त्यांनाही घरच्या मैदानावर पराभूत केलं. या विजयासह मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये उडी घेतली आहे.
-
PBKS vs MI : ईशान किशन आऊट
अर्शदीप सिंगने कॅच पकडल्यार ओव्हर टाकताना इशान किशनला आऊट केलं आहे. मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढलं आहे. यासह मुंबईने चौथी विकेट गमावली असून तो 75 धावा काढून परतला आहे.
-
-
PBKS vs Mi : मुंबईच्या 150 धावा पूर्ण
15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशान किशनने एक धाव घेत मुंबईच्या 150 धावा पूर्ण केल्या. यावेळी इशान आणि सूर्यकुमार शानदार फलंदाजी करत असून त्यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे.
-
मुंबईला दुसरा धक्का
सहाव्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीन बाद झाला. नॅथन एलिसच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या राहुल चहरने त्याचा झेल घेतला. 18 चेंडूत त्याने 22 धावा केल्या आहेत. आता मैदानात सुर्यकुमार यादव आला आहे.
-
PBKS vs MI : मुंबईला पहिला धक्का
पहिला ओव्हर टाकणाऱ्या ऋषी धवनने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला आहे. 215 धावांवर धावांचा पाठलाग करताना रोहित शून्यावर बाद झाल्याने मुंबईची खराब सुरूवात झाली आहे.
-
-
पंजाबची गाडी सुसाट, आजही 200 पार
पंजाब किंग्ज संघाने 3 गडी गमावून 214 धावा केल्या आहेत. लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 धावा केल्या. जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली.
-
पंजाबने केली 150 धावसंख्या पार
16 ओव्हरनंतर पंजाब किंग्जची धावसंख्या 3 बाद 152 अशी आहे. जितेश शर्मा 14 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 31 चेंडूत 49 धावांवर खेळत आहे.
-
PBKS vs MI : पंजाबला दुसरा धक्का
पंजाब किंग्जला दुसरा धक्का बसला आहे. पीयुष चावलाने कर्णधार शिखर धवनला 30 धावांवर आऊट केलं आहे.
-
पंजाबचं अर्धशतक पूर्ण
पंजाबच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टने एक धाव घेत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. यासह पॉवरप्ले संपला आणि पंजाबची धावसंख्या एका विकेटवर 50 धावा झाली.
-
PBKS vs MI : पंजाबला पहिला धक्का
पंजाबची पहिली विकेट पडली आहे. प्रभसिमरन सिंह 9 धावांवर आऊट झाला आहे. दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर तो इशान किशनच्या हाती अर्शद खानकरवी कॅचआऊट झाला.
-
PBKS vs MI : इम्पॅक्ट प्लेअर्स
मुंबई इम्पॅक्ट प्लेअर्स : सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स.
पंजाब किंग्ज इम्पॅक्ट प्लेअर्स : नॅथन एलिस, सिकंदर रझा, अथर्व तायडे, मोहित राठी, शिवम सिंग.
-
PBKS vs MI : सूर्यकुमार बाहेर
मुंबईच्या अंतिम 11 मध्ये सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलं नाही. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये सूर्याचा समावेश करण्यात आला आहे.
-
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान
-
PBKS vs MI : कोणी जिंकला टॉस
मुंबई संघाने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.
-
कोण जिंकणार टॉस?
चालू हंगामात पंजाब आणि मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 22 एप्रिल रोजी जेव्हा दोघे मुंबईत भेटले तेव्हा पीबीकेएसने 13 धावांनी विजय मिळवला होती. रोहित ब्रिगेड आज पंजाबकडून या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे
Published On - May 03,2023 6:43 PM
