रविचंद्रन अश्विनने निवडली ऑल टाईम आयपीएल 11, जाणून घ्या कोण कर्णधार आणि कोणाला मिळालं स्थान ते
भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विनने ऑल टाईम आयपीएल 11 निवडली आहे. आतापर्यंतच्या 17 पर्वातील आकलन करून त्याने संघाची निवड केली आहे. यात सात भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर चार खेळाडू विदेशी आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या पर्वाची खलबतं सुरु आहेत. यासाठी फ्रेंचायझींमध्ये उलथापालथ सुरु झाली आहे. कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला रिलीज करायची याची चर्चा सुरु आहे. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षावर होणार यात शंका नाही. असं सर्व चित्र असताना आयपीएलच्या बेस्ट इलेव्हनची निवड अश्विनने केली आहे. आर अश्विनने आतापर्यंतच्या 17 पर्वाचं आकलन करून 11 बेस्ट खेळाडू निवडले आहेत. यात भारताचे 7 आणि विदेशी सात खेळाडू आहेत. दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, वेस्ट इंडिजचा सुनील नरीन, श्रीलंकेचा मलिंगा आणि अफगाणिस्तानच्या राशीद खानचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचे चार खेळाडू, चेन्नई सुपर किंग्सकडून दोन खेळाडू, आरसीबीकडून दोन, गुजरात टायटन्सकडून 1, कोलकाता नाइट रायडर्सकडून 1, सनरायझर्स हैदराबादकडून 1 खेळाडू आहेत.
आर अश्विनने निवडलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधार आणि विकेटकीपरची भूमिका सोपवली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात महेंद्रसिंह धोनी पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माही संघात आहे. पण त्याच्याऐवजी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीला प्राधान्य दिलं आहे. ख्रिस श्रीकांत यांच्या चीकी चीका या युट्यूब चॅनेलशी बोलताना अश्विनने ऑल टाईम आयपीएल 11 निवडली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीवीर म्हणून उतरतील. सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर, सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर, एबी डिव्हिलियर्स पाचव्या आणि महेंद्रसिंह धोनी सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून सुनील नरीन, राशीद खान संघात असेल. दोन्ही खेळाडूंवर फिरकीची जबाबदारी असेल. भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह याच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. विशेष म्हणजे या संघात हार्दिक पांड्या, डेविड वॉर्नर आणि ख्रिस गेलला स्थान मिळालेलं नाही.
रविचंद्रन अश्विनने निवडलेली प्लेइंग 11 : रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), सुनील नरीन, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.
