Video : विकेट पडता पडे ना…! रवींद्र जडेजा संतापला आणि थेट अंशुल कंबोजवर काढला राग, झालं असं की..
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड आता सैल होताना दिसत आहे. पहिल्या डावात भारताने केलेल्या धावांचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग केला आहे. तसेच आता त्यात अतिरिक्त धावांची भर पडणार आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडने खऱ्या अर्थाने भारताने बेजबॉलचा दणका दिला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या डावात भारताने 358 धावांची खेळी केली. पण या धावांचा इंग्लंडने यशस्वीरित्या पाठलाग केला. ते देखील फक्त 4 विकेट गमवून.. त्यामुळे आता इंग्लंड भारतासमोर पहिल्या डावातच मोठी आघाडी घेण्याची शक्यता आहे. ही आघाडी मोडून काढणं भारताला कठीण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असताना भारतीय संघ इंग्लंडच्या विकेट काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. विकेट घेण्यासाठी गोलंदाज सर्वस्वी पणाला लावत आहे. पण इंग्लंडचे फलंदाज सर्व हल्ला परतवून लावत आहेत. असं असतान तिसऱ्या दिवशी अंशुल कंबोजकडून मोठी चूक घडली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्याच्या या चुकीमुळे भारताला जो रूटची विकेट मिळाली नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाने त्याच्यावर मैदानातच राग काढला.
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जो रूटची विकेट पडण्याची शक्यता बळावली होती. रूटने सिराजने टाकलेला चेंडू गली एरियात मारला आणि तिथे रवींद्र जडेजा उभा होता. जडेजाने पटाईतपणे हा चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईकला फेकला. पण चेंडू काही विकेटला लागला नाही. पण हे सर्व घडत असताना मिड ऑनवर असलेला अंशुल कंबोज धावत नॉन स्ट्राईकला येऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. तसं पाहीलं तर जो रूट हा क्रिजपासून खूप लांब होता. त्यामुळे रवींद्र जडेजाचा पारा चढला. त्याने कंबोजला काही तरी ऐकवल. त्याच्या हावभावावरून रागवलेला दिसला.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) July 25, 2025
जो रूटने भारताविरुद्ध मैदानात जम बसवला आहे. आणखी एक शतकाकडे कूच केली आहे. दरम्यान, जो रूटने अर्धशतकी खेळीसह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटी सर्वाधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविड आणि जॅक कॅलिसचा विक्रम मोडीत काढला आहे. द्रविडने 13288 आणि 13289 धावा केल्या होत्या. आता जो रूट यांच्या पुढे निघून गेला आहे. आता रिकी पॉन्टिंग 13378 आणि सचिन तेंडुलकर 15921 धावांसह त्याच्या पुढे आहेत.
