AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT, IPL 2026 : चार कारणांमुळे क्वॉलिफायर 1 ची उत्सुकता शिगेला, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना धर्मशाळेत होणार असून उत्साह शिगेला पोहोचला. चार कारणांमुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. चला जाणून घेऊयात कारणं काय आहेत ती...

RCB vs GT, IPL 2026 : चार कारणांमुळे क्वॉलिफायर 1 ची उत्सुकता शिगेला, काय ते जाणून घ्या
RCB vs GT, IPL 2026 : चार कारणांमुळे क्वॉलिफायर 1 ची उत्सुकता शिगेला, काय ते जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2026 | 3:12 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा एक स्पर्धक क्वॉलिफायर 1 फेरीच्या निकालातून समोर येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. धर्मशाळेत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि साडे सात वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ तगडे आहेत. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार हे नक्की आहे. दुसरीकडे, हा सामना 4 कारणांमुळे चर्चेत आला आहे. ही कारणं आकडे आणि धर्मशाळेतील मैदानाशी निगडीत आहेत.

गुजरात टायटन्ससाठी अनोळखी मैदान

आयपीएल 2026 स्पर्धेत क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होत आहे. हे मैदान गुजरात टायटन्ससाठी अनोळखी आहे. कारण 2022 मध्ये स्पर्धेत भाग घेतल्यापासून गुजरात टायटन्स या मैदानावर पहिल्यांदा सामना खेळणार आहे. दुसरीकडे, आरसीबीने या पर्वात या मैदानावर एक सामना खेळला आहे. त्यात विजयही मिळवला आहे. या सामन्यात 222 धावांचं लक्ष्य पंजाब किंग्ससमोर ठेवलं होतं आणि 23 धावांनी हा सामना जिंकला.

पहिल्यांदा प्लेऑफमध्ये भिडणार

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आठ वेळा भिडले आहेत. या आठ सामन्यात दोन्ही संघांनी समान अर्थात 4-4 सामने जिंकले आहेत. पण हे सामने साखळी फेरीत झाले होते. त्यामुळे प्लेऑफमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत.

आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा एक सारखा रेकॉर्ड

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार आहेत. पण या सामन्यापूर्वी मागच्या तीन पर्वांची आकडेवारी महत्त्वाची आहे. 2023 पासून आतापर्यंत आरसीबी आणि गुजरात हे दोन्ही संघ यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही संघांचा विजय आणि पराभवाचा आकडा एक सारखा आहे. दोन्ही संघांनी 34 सामन्यात विजय, त 24 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

क्वॉलिफायर 1 मध्ये विजय आवश्यक

क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांना विजय आवश्यक आहे. कारण या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. आतापर्यंत 18 पर्वापैकी 12 पर्वात क्वॉलिफायर 1 मधील विजेता संघ चॅम्पियन ठरला आहे. यात मागची सलग 8 पर्व आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल