AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI : मुंबई इंडिअन्सचा पराभव पण तिलक वर्मा याने केली थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

बई इंडिअन्स संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र युवा खेळाडू तिलक वर्माने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यासोबतच त्याने धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री केलीये.

RCB vs MI : मुंबई इंडिअन्सचा पराभव पण तिलक वर्मा याने केली थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 03, 2023 | 12:37 AM
Share

मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्स संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबईचा 8 विकेट्स आणि 22 बॉल राखून पराभव केला आहे. या सामन्याध्ये मुंबईचे सर्व बॅट्समन फेल गेलेले दिसले. मात्र एका युवा खेळाडूने सर्वांची मनं जिंकली तो खेळाडू म्हणजे तिलक वर्मा.

एकट्याच्या जोरावर त्याने मुंबईला 170 चा टप्पा ओलांडूवन दिला होता. 46 चेंडूंमध्ये तिलक वर्मा याने 84 धावांची दमदार खेळी केली. या खेळीमुळे त्याने एक स्पेशल क्लबमध्ये आपली जागा मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे.

आरसीबी संघाविरूद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूंमध्या त्याने जागा मिळवली आहे. डेव्हिड मिलरच्या नावावर आरसीबीविरुद्ध सर्वाधिक डावांचा विक्रम आहे. आयपीएल 2013 मध्ये त्याने 38 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी नितीश राणा असून त्याने नाबाद 85 धावा केल्या होत्या. तिसऱ्या स्थानी धोनीने आयपीएल 2019 मध्ये आरसीबीविरुद्ध 48 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. तर आजच्या कडक खेळीमध्ये तिलकनेही 84 धावांची नाबाद खेळी करत तोसुद्धा तिसऱ्या स्थानी आला आहे.

आजच्या सामन्यामध्ये मुंबईने 48 धावांच्या आतच आपले 4 मोहरे गमावले होते. यामध्ये रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव हे बाद झाले होते. मात्र त्यानंतर तिलकने मुंबईची कमान आपल्या हातात घेत नेहल वढेरासोबत पाचव्या विकेटसाठी 50 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. 14व्या षटकात वढेरा बाद झाल्यावर त्याने अर्शद खान सोबत भागीदारी केली, शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्याने 38 धावा काढल्या. या धावांच्या जोरावर मुंबईने 171 धावा केल्या.

दरम्यान, आरसीबीकडून विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस यांनी 148 धावांची सलामी दिली. मुंबईला सामन्यामध्ये येऊ देण्याची एकही संधी दिली नाही. फॅफ 73 धावा करून बाद झाला. विराट कोहली  82 धावा करून नाबाद राहिला. त्यानंतर आलेला कार्तिक तिसऱ्या बॉलवर बाद झाला, मॅक्सवेलने दोन षटकार मारत सामना जिंकून दिला.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार