AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB Vs PBKS IPL 2025 Final Live Streaming : आरसीबी विरुद्ध पंजाब महामुकाबल्याला किती वाजता सुरुवात होणार?

Watch IPL 2025 Final Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live in Marathi : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा विजेता कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. अंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध पंजाब यांच्याच कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

RCB Vs PBKS IPL 2025 Final Live Streaming : आरसीबी विरुद्ध पंजाब महामुकाबल्याला किती वाजता सुरुवात होणार?
RCB vs PBKS IPL 2025 Final Live StreamingImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 03, 2025 | 4:37 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या हंगामात आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे. अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी याआधी अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे कोणता संघ 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर-1 सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. आरसीबीने पहिल्याच झटक्यात फायनलमध्ये धडक दिली. तर दुसऱ्या बाजूला पराभूत झाल्यानंतरही पंजाबला फायनलमध्ये पोहचण्याची अधिकची संधी मिळाली. पंजाब साखळी फेरीनंतर टॉप 2 मध्ये असल्याने ही संधी मिळाली. पंजाब पहिल्या फेरीत अपयशी ठरली. मात्र पंजाबने दुसऱ्या संधीचं सोनं केलं आणि फायनलमध्ये धडक दिली. पंजाबने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत करणाऱ्या मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. यासह अंतिम फेरीतील दुसरा संघही निश्चित झाला. त्यामुळे आता आयपीएल ट्रॉफी कोणता संघ जिंकणार? याचीच चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याला किती वाजता सुरुवात होणा? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना केव्हा?

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना मंगळवारी 3 जून रोजी होणार आहे.

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठीवर प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध पंजाब अंतिम सामना जिओहॉटस्टारद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर पाहायला मिळेल.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.