AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

और ये शानदार थ्रो… सोलापूरच्या अंध तरुणाची कॉमेंट्री, नाईट क्रिकेट स्पर्धेचं भन्नाट समालोचन

क्रिकेट कॉमेंट्री (समालोचन) करण्यासाठी मैदानात काय घडतंय हे पाहणं गरजेचं असतं. परंतु हा समालोचक अंध असूनही त्याचं काम चोख करतोय. या समालोचकाचं नाव आहे समर्थ चौगुले.

और ये शानदार थ्रो... सोलापूरच्या अंध तरुणाची कॉमेंट्री, नाईट क्रिकेट स्पर्धेचं भन्नाट समालोचन
Samarth Chaugule
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 1:02 PM
Share

सोलापूर : क्रिकेट (Cricket) हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातला हा सर्वात प्रसिद्ध तसेच सर्वाधिक खेळला आणि पाहिला जाणारा खेळ आहे. इथल्या गल्लीबोळांपासून ते मुंबईच्या वानखेडे, कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमपर्यंत 12 महिने क्रिकेट फिव्हर पाहायला मिळतो. जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा भारतातच भरवली जाते. यासोबतच विविधं राज्य, शहरं, जिल्हे, तालुके आणि गावांच्यादेखील क्रिकेट प्रीमियर लीग भरवल्या जातात. तिथेही खेळाडू आणि क्रिकेटरसिकांची गर्दी जमते. त्यांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीसाठी समालोचक (Cricket Commentary) असतात. सध्या सोलापूरमधल्या अशाच एका समालोचकाची सर्वत्र चर्चा आहे. कारण हा समालोचक अंध असूनही (Blind Commentator) उत्तम कॉमेंट्री करतो, विशेष म्हणजे हा तरुण समालोचक मराठीसह हिंदी भाषेत समालोचन करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

क्रिकेट कॉमेंट्री (समालोचन) करण्यासाठी मैदानात काय घडतंय हे पाहणं गरजेचं असतं. परंतु हा समालोचक अंध असूनही त्याचं काम चोख करतोय. या समालोचकाचं नाव आहे समर्थ चौगुले.

माढा शहरात युवा ग्रुपच्या वतीने सुरु असलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेत अंजनगावच्या समर्थ चौगुलेची क्रिकेट कॉमेंट्री ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. कारण समर्थ पूर्णपणे अंध आहे. तरीदेखील तो त्याचं काम चोख करतो. त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र त्याला केवळ धावा आणि इतर निर्णय सांगतो आणि तेवढ्या माहितीवर समर्थ कॉमेंट्री करतो. समर्थची आई अंगणवाडी सेविका आहे तर त्याचे वडील सोलापूरला कामगार आहेत.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?

MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स

PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.